Mumbai Indians Skipper Rohit Sharma Press Conference : वानखेडे मैदानात शनिवारी झालेल्या आयपीएलच्या १२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा दारुण पराभवा केला. मुंबईने २० षटकात १५७ धावांपर्यंत मजल मारली होती. पण चेन्नईने १८.१ षटकात १५९ धावा करत सामना ७ विकेट्स राखून जिंकला. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने अपेक्षित अशी कामगिरी केली नाही. मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. दोन सामने हरल्यानंतर मला आणि अन्य अनुभवी खेळाडूंना जबाबदारीने खेळून चांगली कामगिरी करावी लागेल, असं रोहितनं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पुढे म्हणाला, माझ्यासह अन्य खेळाडूंना चांगली फलंदाजी करून अधिक धावा करण्याची गरज आहे. आम्हाला आयपीएलच्या पद्धतीबाबत चांगलं माहित आहे. आम्हाला लय प्राप्त करण्याची गरज आहे. जर असं काही केलं नाही, तर या गोष्टी संघासाठी अडचणीच्या ठरतील. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करण्याची गरज आहे. आक्रमक फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. हिम्मत दाखवायची गरज आहे. आमच्याकडे काही असे खेळाडू आहेत, जे आयपीएलमध्ये नवीन आहेत. त्यांना काही वेळ द्यावा लागेल. यासाठी वेळ लागेल. पण आम्हाला त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. मुंबईच्या संघाने पॉवर प्ले मध्ये एक विकेट गमावत ६१ धावा केल्या. परंतु, त्यानंतर ८ विकेट्स गमावून १५७ धावाच करता आल्या. आम्ही ४० धावा कमी केल्या.

नक्की वाचा – बापरे! अंपायर थोडक्यात वाचला; वाऱ्याच्या वेगानं आलेल्या चेंडूला जडेजानं पकडलं, थरारक झेलचा Video पाहिलात का?

सीएसकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईला फलकावर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा २१ धावा करून बाद झाला. तर धावांसाठी संघर्ष करत असलेला सूर्यकुमार यादव फक्त एका धावेवर असताना बाद झाला. सीएसकेनं सामना जिंकल्यानंतर रविंद्र जडेजाला प्लेयर ऑफ द मॅच किताब देऊन सन्मानित करण्यात आलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma tells the reason behind mumbai indians defeat against chennai super kings rohit sharma press conference nss