Rohit Sharma Tilak Varma viral Video: रोहित शर्माचे स्टंप माईकवरील संभाषण गेल्या काळात खूपच चर्चेचा विषय ठरले. इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान भारताचा संघ गोलंदाजी करत असताना रोहितने संघातील नव्या तरूण खेळाडूंनी ताकीद दिली होती. यादरम्यान रोहित म्हणाला होता, ‘गार्डनमध्ये कोणी फिरलात तर बघा.’ याचाच अर्थ रोहितला सांगायचं होतं की फिल्डिंग नीट करा. रोहितची ही स्टंप माईकवरील खूपच गाजली, यानंतर रोहित शर्मानेही तरूण खेळाडूंसोबतचा फोटो पोस्ट करत ‘गार्डनमध्ये फिरणारी मुले’ असं कॅप्शन त्याला दिलं होतं. आता पुन्हा एकदा आयपीएलदरम्यान गार्डनमधील कमेंट्चा रोहितचा एक व्हीडिओ मुंबई संघाने पोस्ट केला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हीडीओमध्ये तिलक वर्मा आणि रोहित शर्मामधील मजेदार संभाषण दाखवलं आहे. तिलक वर्मा मैदानात उभा राहून त्याचा फोन वापरताना दिसत आहेत आणि त्याच दरम्यान रोहित शर्मा मैदानात येत असतो. हिटमॅन तिलकला पाहून तो त्याला प्रश्न करतो आणि म्हणतो, “अरे हिरो. काय करतोय? चप्पल घालून फिरतोयस ते गार्डनमध्ये आलाय का?”

तिलकनेही रोहितच्या प्रश्नाला मजेशीर उत्तर दिले, जे ऐकून रोहित शर्माही क्षणभर चकित झाला. तिलक म्हणाला “हो, हे काय ईडन गार्डन्स आहे ना .’ तिलक वर्माचे उत्तर ऐकून रोहित आश्चर्याने म्हणतो, ‘काय, ईडन गार्डन्स.’ आणि रोहित हसू लागतो.  रोहित शर्मा आणि तिलक यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ईडन गार्डन्स मैदान हे रोहित शर्माच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे. याच मैदानावर रोहित शर्माने २०१३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इतकेच नव्हे तर याच मैदानावर त्याने १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये वनडे क्रिकेटमधील २६४ ही सर्वाेच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे आज हिटमॅनच्या बॅटमधून चाहत्यांना नक्कीच स्फोटक खेळीची अपेक्षा असेल.

आयपीएलमध्ये आज ईडन गार्डन्स स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तर केकेआरचा संघ पहिल्या स्थानावर असून प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. 

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma tilak varma funny chat video goes viral kya garden mein ghumne aaya hai kya mi vs kkr ipl 2024 bdg