IPL 2025 Rohit Sharma Shardul Thakur Viral Video: मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२५ मधील पुढील सामना लखनौमध्ये शुक्रवारी खेळवला जाणार आहे. हा सामना लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध होणार आहे. उभय संघांमधील या लढतीत चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यावर असतील. आयपीएलच्या सुरुवातीपासून हे दोघेही मोठी कामगिरी करू शकले नाही. दरम्यान सामन्यापूर्वीचा रोहितचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो शार्दुल ठाकूरला चिडवताना दिसत आहे.
पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत एकच सामना जिंकला आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. हीच गोष्ट लखनौचा कर्णधार ऋषभ पंतच्या बाबतीतही आहे, ऋषभ पंतदेखील फॉर्मात नाहीये.
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा लखनौ सुपर जायंट्सचा खेळाडू शार्दुल ठाकूरला मजेदार पद्धतीने ट्रोल करताना दिसत आहे. रोहित शर्माचा हा मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रोहित शर्माचा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा मैदानात जाऊन लखनौच्या खेळाडूंची भेट घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर लखनौचा खेळाडू शार्दुल ठाकूरही तिथे असतो. तितक्यात शार्दुल सराव थांबवत म्हणतो, थांब थांब रोहित शर्मा मैदानात फक्त एकाच व्यक्तीला भेटण्यासाठी येतो, तो म्हणजे लॉर्ड, तितक्यात रोहितला शार्दुल हात मिळवत गळाभेट घेतो, हे ऐकताच रोहित म्हणतो, हा स्वत:ला द लॉर्ड म्हणतोय… आणि रोहितसह स्वत: शार्दुलही हसू लागतो.
पुढे शार्दुल म्हणतो, मग काय तूच तर हे नाव ठेवलं आहेस. नंतर रोहित झहीर खानला आवाज देत मिस्टर खान म्हणत त्याची भेट घेतो. रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर मुंबई क्रिकेट संघाकडून एकत्र डॉमेस्टिक क्रिकेट खेळतात आणि एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत.
Lovely to meet ??? ???? & ??. ???? ??#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #LSGvMI [Rohit Sharma] pic.twitter.com/pTDdh0Uwh1
— Mumbai Indians (@mipaltan) April 3, 2025
लखनौ सुपर जायंट्सचा खेळाडू शार्दुल ठाकूरला चाहते लॉर्ड म्हणतात. सोशल मीडियावर चाहत्यांनी शार्दुल ठाकूरला ‘लॉर्ड’ हे टोपण नाव दिले आहे. पण कर्णधार रोहित शर्माने त्याला गेमचेंजर हे टोपण नावही दिले आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या कामगिरीमुळे रोहित शर्माने त्याला गेमचेंजर हे टोपणनाव दिले.