Rohit Sharma reacts to MI defeat: गुजरात टायटन्स ने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ गोलंदाजीसह सर्वच विभागात गुजरातपेक्षा खूपच कमकुवत दिसत होता. शुबमन गिलच्या १२९ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात संघाने २० षटकांत २३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ १८.२ षटकांत १७१ धावांवर गारद झाला.
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “शुबमनने या विकेटवर चांगली फलंदाजी केली आणि त्याने आपल्या डावात २० ते २५ धावा अधिक केल्या. पहिला डाव संपल्यानंतर आम्ही खूप सकारात्मक होतो. ग्रीन आणि सूर्या यांनी चांगली फलंदाजी केली, पण आम्ही हरलो. पॉवरप्लेदरम्यान आम्हाला झटपट धावा काढता आल्या नाहीत. एका फलंदाजाने शेवटपर्यंत खेळ करावा अशी आमची इच्छा होती, पण आम्ही ते करू शकलो नाही. या विजयाचे श्रेय आपण गुजरातला द्यायला हवे, ज्यांनी चांगला खेळ केला.”
रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, “इशान किशनला दुखापत झाल्यामुळे अचानक बाहेर पडणे निश्चितच धक्कादायक होते. पण अशा गोष्टींसाठी आपण तयार असले पाहिजे आणि त्याचा जास्त विचार करू नये. या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट राहिली आहे.
हेही वाचा – MI vs GT: मुंबईविरुद्ध शतक झळकावत शुबमन गिलने रचला इतिहास, अनेक दिग्गजांना मागे टाकत लावली विक्रमांची रांग
या हंगामात आमच्यासाठी फलंदाजी सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट –
मुंबई इंडियन्सच्या या मोसमाचा शेवटही या सामन्याने झाला. रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात संघाची सर्वोत्तम फलंदाजी ही या हंगामातील सर्वात मोठी सकारात्मक बाजू असल्याचे सांगितले. जे त्याला पुढील हंगामातही सुरू ठेवायला आवडेल. त्याचवेळी रोहितने असेही सांगितले की या हंगामात टीम डेव्हिडला टीमने वेगळी भूमिका दिली होती.
हेही वाचा – MI vs GT: मोहित शर्माच्या ‘त्या’ विकेटने सामन्याला दिली कलाटणी, टर्निंग पॉइंटचा VIDEO होतोय व्हायरल
शुबमन गिलने ऋषभ पंतचा विक्रम मोडला –
शुबमन गिलने १२९ धावांची खेळी खेळून ऋषभ पंतचा विक्रम मोडला. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, ऋषभ पंत नाबाद १२८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. आयपीएल मधील सर्वात मोठी खेळी करणार भारतीय फलंदाज म्हणून केएल राहुल १३२ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.