MI vs RR Match Highlights, Rohit Yashasvi Video: यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकासह राजस्थानने मुंबईवर ९ विकेट्स आणि ८ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला आहे. आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये टॉपला असणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात खऱ्या अर्थाने चमकलेला खेळाडू यशस्वीने ६० चेंडूत ७ षटकार आणि ९ चौकारांसह १०४ धावांची नाबाद खेळी केली. तर संदीप शर्माने ४ षटकांत १५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. संदीप व यशस्वीच्या खेळीमुळे राजस्थानने मुंबईच्या संघावर १८.४ शतकात मात केली. कालच्या विजयांनंतर राजस्थान रॉयल्सने १४ पॉईंट्ससह आयपीएल पॉईंट टेबलमध्ये टॉपचे स्थान कायम राखले आहे. राजस्थानच्या विजयाइतकीच सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका खास पोस्टची सुद्धा चर्चा आहे. मराठी प्रेक्षकांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गाण्याची रील राजस्थानने सामन्याआधी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती, ज्यावर लोकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थान रॉयल्सच्या रीलमध्ये सरावादरम्यानचा एक क्षण शेअर केलेला आहे. रोहित शर्माला यशस्वी जैस्वाल भेटायला जातो, हात मिळवतो आणि त्याच्या बाजूला बसतो. खरं बघायला गेलं तर या रीलमध्ये एवढंच घडतं पण विशेष लक्षवेधी बाब म्हणजे कॅप्शन आणि गाणं. भारताचे सलामीवीर, मुंबई बॉईज असं कॅप्शन देत शेअर केलेला या रीलला वादळवाट या प्रसिद्ध मालिकेचं शीर्षक गीत जोडण्यात आलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी खूप प्रेमाने कमेंट्स केल्या आहेत. “ही आतापर्यंतची सर्वात सुंदर रील होती”, “सोशल मीडियाचा तुम्ही परफेक्ट वापर करत आहात”, “आज राजस्थान रॉयल्सच्या पेजच्या ऍडमिनने मन जिंकलं आहे”. “मराठी भाषेचा गोडवा आहेच सगळ्यांना भुरळ पाडणारा” अशा पद्धतीच्या कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळतायत. तर काहींनी मजेशीर कमेंट करत “राजस्थानचे फॅन्स आता या गाण्याचा अर्थ शोधत असतील.” “मुंबई इंडियन्सच्या पेजचा ऍडमिन सोडून बाकी सगळ्याच टीम मराठी गाणी वापरतायत”, असंही म्हटलं आहे.

हे ही वाचा<<“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती

काही दिवसांपूर्वी, पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात जेव्हा मुंबई इंडियन्सने विजय मिळवला होता तेव्हाही पंजाबच्या सोशल मीडिया पेजवर मराठमोळ्या पोस्ट पाहायला मिळाल्या होत्या. नाना पाटेकरांच्या फोटोसह नटसम्राट चित्रपटातील “विधात्या तू एवढा कठोर का झालास?”, “सरकार उठा आता”, असे मीम्स शेअर करण्यात आले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma yashasvi jaiswal emotional video with vadalvat title songs mumbai indians vs rajasthan royals highlights ipl point table svs