Chennai Super Kings vs Mumbai Indians Match Updates: आयपीएल २०२३ च्या ४९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वांना वाटतं होते की, आता मुंबईच्या डावाची सुरुवात नेहमीप्रमाणे रोहित शर्मा आणि इशान किशन करतील. पण असे झाले नाही, कारण रोहितने त्याच्याऐवजी कॅमेरुन ग्रीनला सलामी पाठवले. पण त्याची रणनीती यशस्वी झाली नाही. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

या सामन्यात सलामीवीर म्हणून कॅमेरून ग्रीन ६ धावा करून बाद झाला, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार रोहित शर्माही शून्यावर बाद झाला. या सामन्यात रोहित शर्माला दीपक चहरने बाद केले. यापूर्वीच्या सामन्यातही हिटमॅन शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे रोहित शर्माच्या नावावर आयपीएल इतिहासातील एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
WTC Points Table India slip to 3rd after after IND vs AUS Pink Ball Test Defeat Australia No 1 again
WTC points Table: ना पहिलं, ना दुसरं स्थान, भारताला दुसऱ्या कसोटी पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा धक्का; ‘या’ क्रमांकावर घसरला संघ
Mohammed Siraj Statement on Travis Head Sendoff Incident Said Its a lie that he said well bowled to me
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

हिटमॅन आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला –

गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा धावा करू शकला नाही, त्यामुळे त्याने सीएसकेविरुद्ध फलंदाजीची स्थिती बदलण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची रणनीती यशस्वी झाली नाही आणि दीपक चहरच्या चेंडूवर तो खराब शॉट खेळून झेलबाद झाला. आयपीएलमध्ये तो शून्यावर आऊट होण्याची ही १६वी वेळ आहे. या लीगमध्ये तो शून्यावर आऊट होण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने दिनेश कार्तिक, सुनील नरेन आणि मनदीप सिंग यांना मागे टाकले. या लीगमध्ये तिघेही १५-१५ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

रोहित शर्माने गौतम गंभीरचा विक्रम मोडला –

रोहित शर्मा आता आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. कर्णधार म्हणून तो या लीगमध्ये ११व्यांदा शून्यावर आऊट झाला. त्याचबरोबर रोहितने गौतम गंभीरला मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून गौतम गंभीर १० वेळा शून्यावर बाद झाला होता.

हेही वाचा – IPL 2023DC vs RCB: आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीला मोठा धक्का; ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाज मायदेशी परतला

दीपक चहरविरुद्ध रोहितची नेहमीच उडाली तारांबळ –

आयपीएलमध्ये दीपक चहरविरुद्ध रोहित शर्माची बॅट नेहमीच शांत राहिली आहे. त्याने आतापर्यंत दीपक चहरच्या ४९ चेंडूंचा सामना केला आहे, ज्यात त्याने ६० धावा केल्या आहेत आणि तीनदा तो बाद झाला आहे. २० डॉट बॉल्स खेळताना त्याने दीपकच्या चेंडूंवर ९ चौकार मारले आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट १२२.४४ राहिला आहे.

Story img Loader