गुणतालिकेत शेर असणाऱ्या राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या घरच्या मैदानावर चीतपट करत ‘रॉयल्स’ कोण हे सिद्ध केले. शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरूने रॉयल्सचा डाव ११७ धावांतच गुंडाळला. दिलशान, बंगळुरूची रनमशिन विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स झटपट बाद झाल्याने बंगळुरूच्या चिंता वाढल्या. मात्र ख्रिस गेलने नाबाद ४९ धावांची खेळी करत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिलशान(२५) -गेल जोडीने ५३ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर शेन वॉटसनने त्याला बाद केले. विराट कोहलीला (१) त्रिफळाचीत करत जेम्स फॉल्कनरने राजस्थानच्या आशा पल्लवित केल्या. त्यापाठोपाठ ए‘बी डी‘व्हिलियर्सही (७) झटपट माघारी परतल्याने राजस्थानचा उत्साह वाढला. ेसंधी मिळालेल्या सौरभ तिवारीने ख्रिस गेलला साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत बंगळुरूला ७ विकेट्सने विजय मिळवून दिला. गेलने चार चौकार आणि एक षटकार ठोकत नाबाद ४९ तर तिवारीने नाबाद २५ धावा केल्या.
तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या भेदक गोलंदाजीमुळे केवळ ११७ धावांचीच मजल मारता आली. धडाकेबाज शेन वॉटसनला झटपट बाद करत रवी रामपॉलने रॉयल्सला बाद केले. जयदेव उनडकतचा बाहेरचा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात अजिंक्य रहाणे दिलशानकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर अनुभवी राहुल द्रविडने स्टुअर्ट बिन्नीला हाताशी घेत डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. विनय कुमारने बिन्नीला बाद करत ही जोडी फोडली. द्रविड-हॉज जोडीने चौथ्या विकेटसाठी ३१ धावा जोडत आणखी पडझड टाळली. मात्र मुरली कार्तिकने द्रविडला बाद करत बंगळुरूला सामन्यात परतण्याची संधी दिली. द्रविड बाद झाला तेव्हा १४.४ षटकांत ४ बाद ९७ अशा स्थिती होती. द्रविडला बाद केल्यानंतर बंगळुरूने सातत्याने विकेट्स मिळवत रॉयल्सचा डाव ११७ धावांतच गुंडाळला. आर. विनय कुमारने १८ धावांत ३ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : १९.४ सर्वबाद ११७ (राहुल द्रविड ३५, स्टुअर्ट बिन्नी ३३, आरपी. सिंग ३/१३, पराभूत विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १७.५ षटकांत ३ बाद १२३ (ख्रिस गेल नाबाद ५९, दिलशान २५, सौरभ तिवारी २५, शेन वॉटसन २/११)
सामनावीर :विनय कुमार
संघ सा वि हा गु
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ७ ५ २ १०
सनरायजर्स हैदराबाद ७ ५ २ १०
चेन्नई सुपर किंग्स ६ ४ २ ८
राजस्थान रॉयल्स ६ ४ २ ८
मुंबई इंडियन्स ५ ३ २ ६
किंग्स इलेव्हन पंजाब ५ २ ३ ४
कोलकाता नाइट रायडर्स ६ २ ४ ४
पुणे वॉरियर्स ६ २ ४ ४
दिल्ली डेअरडेव्हिल्स ६ ० ६ ०
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा