Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore Match Update : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामाता एकापेक्षा एक रंगतदार सामने होत असून या लीगचा ९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. इडन गार्डनमध्ये कोलकाता-बंगळुरु आमने-सामने उतरणार आहेत. कोलकाताला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जकडून डकवर्थ लुईस नियमानुसार पराभवाचा सामना करावा लागला होता. तसंच त्यानंतर कोलकाता संघाला दोन मोठे धक्के बसले. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन कौंटुबिक कारणांमुळे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रतिबद्धतेमुळे टूर्नांमेटमधून बाहेर पडला आहे. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी नियमित कर्णधार आणि प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळं संपूर्ण आयपीएल लीगमधून बाहेर झाला.
मजबूत प्लेईंग ११ सोबत उतरणार नितीश राणा
नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाता संघाला या सीजनमध्ये पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. अशा परिस्थितीत तो आता बंगळुरुविरुद्ध मजबूत प्लेईंग-११ सोबत मैदानात उतरू शकतो. तसंच दुसरीकडे बंगळुरुचा संघही दुसऱ्या विजयासाठी मैदानात सर्वस्व पणाला लावताना दिसेल. केकेआरने नितीश राणाला कार्यवाहक कर्णधार म्हणून नियुक्त केलं होतं. श्रेयस अय्यर टूर्नामेंटमधून बाहेर झाल्याने कोच चंद्रकांत पाटील यांची टीम संकटात सापडली आहे. राणाला दिल्लीकडून व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि त्याच्यासमोर आता घरेलु मैदानावर संघाला वापसी करून देण्याचं मोठं आव्हान आहे.
सामन्यात अशी असू शकते प्लेईंग ११
बंगळुरु टीम : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई/मोहम्मद सिराज (इम्पॅक्ट प्लेयर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, आकाश दीप, डेविड विली आणि कर्ण शर्मा.
कोलकाता टीम : मनदीप सिंह, रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), अनुकूल रॉय, वेंकटेश अय्यर, नीतीश राणा (कप्तान), रिंकू सिंह/वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकुर/कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव आणि टीम साऊदी.