पावसाच्या व्यत्ययामुळे विजय मिळवता आला नसला तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मात्र एका गुणाच्या आधारे ‘प्ले-ऑफ’मधली स्थान निश्चित केले आहे.
प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉक आणि कर्णधार जे. पी. डय़ुमिनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने १८७ धावांपर्यंत जमल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बंगळुरूचा संघ उतरला असता त्यांनी १.१ षटकांत बिनबाद २ अशी अवस्था असताना पावसाने जोरदार आगमन केले आणि सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला आहे.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : ५ बाद १८७ (क्विंटन डी कॉक ६९, जे.पी. डय़ुमिनी नाबाद ६७; युझवेंद्र चहल २/२६) अनिर्णित वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १.१ षटकांत बिनबाद २.

Story img Loader