गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सना त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवत मनोधैर्य उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पुन्हा ‘रॉयल’ कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. विजयाची लय कायम राखण्याच्या निर्धाराने बंगळुरू संघ सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध घरच्या मैदानावर उतरणार आहे.
ख्रिस गेल़, एबी डि’व्हिलियर्स आणि विराट कोहली हे विस्फोटक फलंदाज घरच्या प्रेक्षकांसमोर धावांची आतषबाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बंगळुरूच्या पुढील तिन्ही लढती येथेच होणार असल्याने या संधीचे सोने करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर असेल. कोलकाताविरुद्धच्या लढतीत गेलने ९८ धावांची वादळी खेळी केली होती आणि त्याच्याच पुनरावृत्तीचा मानस त्याने बोलून दाखविला आहे. गेलच्या तडाखेबंद फलंदाजीला डि’व्हिलियर्स, कोहली यांची साथ लाभल्यास प्रतिस्पर्धी संघासमोर पराभव पत्करण्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. या तिघांव्यतिरिक्त संघात दिनेश कार्तिक हाही मोठी खेळी करण्यासाठी ओळखला जातो. मिचेल स्टार्क संघात उशिरा दाखल होणार असल्यामुळे बंगळुरूची गोलंदाजी थोडीशी कमकुवत वाटत आहे. सीन अॅबॉट, वरुण आरोन यांना अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. फिरकीमध्ये त्यांना युजवेंद्र चहल याच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.
दुसरीकडे सनरायझर्स यजमानांसमोर कडवे आव्हान उभे करण्याची क्षमता ठेवतो. शिखर धवऩ, रवी बोपारा, केन विलियम्सन यांना सूर गवसल्यास बंगळुरूसमोर अडचण वाढू शकते. मात्र, डेल स्टेन याच्या दुखापतीमुळे सनरायझर्सची गोलंदाजी इशांत शर्मा आणि करन शर्मा यांच्यावर अवलंबून आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, एबी डी’व्हिलियर्स, वरुण आरोन, सीन अबॉट, अबू नेचिम, सुब्रमण्यम बद्रीनाथ, शिशिर बावणे, मनविंदर बिस्ला, युजवेंद्र चहल, अशोक दिंडा, इक्बाल अब्दुल्ला, दिनेश कार्तिक, सर्फराझ खान, निक मॅडिसन, मनदीप सिंग, अॅडम मिलने, हर्षल पटेल, रिले रोसू, डॅरेन सॅमी, संदीप वॉरियर, जलाज सक्सेना, मिचेल स्टार्क, योगेश ताकवले, डेव्हिड वाइज, विजय झोल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा