Royal Challengers Banglore vs Delhi Capitals Score Updates : बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगतदार सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी २० षटकांत ६ विकेट्स गमावत १७४ धावांपर्यंत मजल मारली. परंतु, या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची मात्र पुरती दमछाक झाली. पॉवर प्ले मध्येच दिल्लीचा अर्धा संघ गारद झाला. पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शला भोपळाही फोडता आला नाही. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर १९ धावा करून तंबूत परतला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची दाणादाण उडाली अन् आयपीएल २०२३ मध्ये सलग चौथा पराभव झाला. दिल्लीने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५१ धावा केल्या. त्यामुळे आरसीबीने या सामन्यात विजयाचा शिक्कामोर्तब केला.

दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज यश धुल आणि अभिषेक पोरेल स्वस्तात माघारी परतला. पण अनुभवी मनिष पांडेने आरसीबीच्या गोलंजदाजांचा समाचार घेत ३८ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार मारत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. अक्षर पटेलने १४ चेंडूत २१ धावा केल्या. विजयकुमारच्या गोलंदाजीवर अक्षर झेलबाद झाला. आरसीबीसाठी विजय कुमारने ३ विकेट्स घेत आरसीबीची विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. तसंच मोहम्मद सिराजनेही २ विकेट्स घेत दिल्लीला मोठा धक्का दिला.

IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
Pakistan become 1st team to whitewash South Africa at home in ODI bilaterals PAK vs SA
PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
Pakistan Beat South Africa by 80 Runs and Seal ODI Series
PAK vs SA: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गोंधळ आणि बंडाळ्या पण संघाची कमाल; आफ्रिकेला घरच्या मैदानावर दिला दणका
India Women Beat West Indies by 60 Runs in decider to win first home T20I series in five years
INDW vs WIW: भारतीय महिला संघाने संपवला ५ वर्षांचा दुष्काळ, वेस्ट इंडिजला नमवत मिळवला विक्रमी टी-२० मालिका विजय
IND vs AUS Big Blow to Australia as Josh Hazlewood Suffers Calf Injury went Hospital for Scans Gabba Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला गाबा कसोटीत मोठा धक्का, ‘या’ गोलंदाजाला नेलं हॉस्पिटलमध्ये; एक षटक टाकताच गेला होता मैदानाबाहेर
Rajat Patidar Protest 3rd Umpire Blunder Then Re reversed The Decision and Third Umpire Apologises
SMAT 2024: रजत पाटीदार तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर वैतागला, मैदान सोडण्यास दिला नकार; माफी मागत पंचांनी बदलला निर्णय

विराट कोहलीने आजच्या सामन्यातही दमदार शतक ठोकलं. विराटने ३४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावा कुटल्या. परंतु ललिल यादवच्या गोलंदाजीवर कोहली बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. कर्णधार फाफ डु प्लेसिसने या सामन्यात २२ धावांची खेळी केली. त्यानंतर आरसीबीसाठी माहिपाल लोमरोरने १८ चेंडूत २६ धावा केल्या.

दिल्लीचा वेगवाना गोलंदाज मिचेल मार्शने माहिपालला २६ धावांवर पॅव्हेलिनयचा रस्ता दाखवला. त्यानंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेल २४ धावांवर झेलबाद झाला. आरसीबीच्या धावसंख्येची गती मंदावली असतानाच कुलदीप यादवने भेदक मारा करून आरसीबीच्या समस्येत वाढ निर्माण केली. कुलदीपने एकाच षटकात दोन विकेट्स घेऊन आरसीबीच्या फलंदाजीचा गड ढासळला. कुलदीपने मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकला बाद केल्यानं दिल्ली कॅपिटल्सला आरसीबीची धावसंख्या रोखता आली.

Story img Loader