IPL 2023, RCB vs MI Live Cricket Score Update : चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आऱसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टिम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने दमदार अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला विजयी सलामी दिली. आरसीबीने १६. २ षटकात २ विकेट्स गमावत १७२ धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा पराभव झाला.

आरसीबीसाठी विराट कोहलीने ४९ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली. या इनिंगमध्ये विराटने ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तसंच कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही आक्रमक फलंदाजी करत ४३ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. फाफने ५ चौकार आणि ६ षटकार मारले. दिनेश कार्तिकला भोपळाही फोडला आला नाही. तर ग्लेन मॅक्सवेलने ३ चेंडूत १२ धावांची खेळी साकारली. मुंबईचे गोलंदाज कॅमेरुन ग्रीन आणि अर्शद खानला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.

Appi Aamchi Collector
Video : अर्जुनचा ‘तो’ निर्णय ऐकून अमोल पडला बेशुद्ध; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “बंद करा…”
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Navri Mile Hitlarla
Video : लीलाने श्वेताचा केला पर्दाफाश; एजेने दाखवला थेट घराबाहेरचा रस्ता
The Buckingham Murders box office collection day 1
करीना कपूर खानच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…
Ganeshotsav 2024 mushak visits Ganesh pandal and pray with Folded Hands ate Ganapati bappa Modak viral video
किती गोड! मूषकाने बाप्पासमोर जोडले हात अन्…, भक्ताचा VIDEO पाहून व्हाल थक्क
Deepika Padukone and Ranveer Singh became parents to a baby girl
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग झाले आई-बाबा, अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म
Soda seller offered a job for fresher salary upto 6 lpa content creator reel viral video
सोडा विका आणि ६ लाख कमवा! चक्क विक्रेता देतोय फ्रेशर्सना नोकरीची संधी, VIRAL VIDEO एकदा पाहाच
A man sitting on a road in front of the police station was hit by a truck
VIRAL VIDEO: पोलीस चौकीसमोर ठाण मांडून बसला अन् मागून वेगवान ट्रकने दिली धडक, पुढे जे काही घडलं ते पाहून बसेल धक्का

चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आऱसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टिम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली.