IPL 2025 Rajasthan Royals Full Squad and Schedule: संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्सने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. राजस्थानने जोस बटलरला रिलीज केले होते. तर संघातील युवा खेळाडूंना राजस्थानने रिटेन केलं होत. संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखाली आयपीएल २०२५ संघात कोणकोणते नवीन खेळाडू असणार आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने संघातील सहा खेळाडूंना रिटेन केलं आणि ४१ कोटींची सर्वात कमी पर्ससह लिलावात उतरले होते आणि त्यांनी तरीही त्यांनी चांगली संघबांधणी केली. राजस्थानचा आयपीएल २०२५ साठी संघ कसा आहे, जाणून घेऊया.
राजस्थान रॉयल्सने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला ताफ्यात समाविष्ट केलं आहे. जोफ्रा याआधीही राजस्थानकडून खेळला आहे. जोफ्राच्या सहभागाविषयी अनिश्चितता होती. मात्र लिलावाच्या आधी काही तास जोफ्राला इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाला आणि त्याचं नाव समाविष्ट करण्यात आलं. राजस्थानने प्रमुख गोलंदाजांना सोडलं होतं. त्यामुळे आर्चरच्या रुपात त्यांनी मोठं नाव संघात सामील केलं आहे. राजस्थानने आर्चरव्यतिरिक्त वानिंदू हासारंगा आणि महिश तीक्षणा या श्रीलंकेच्या फिरकीपटूंना संघात घेतलं. कुमार कार्तिकेय या फिरकीपटूला मुंबईच्या ताफ्यातून आपल्याकडे आणलं.
राजस्थानच्या ताफ्यातील रिटेन केलेले खेळाडू
आयपीएल २०२५ साठी राजस्थान रॉयल्सने कायम ठेवलेल्या ६ खेळांडूच्या यादीने सर्वांना आश्चर्यचकित केले. ज्यामध्ये आर अश्विन, जोस बटललर आणि युझवेंद्र चहलसारख्या दिग्गजांची नावे नव्हती. राजस्थान रॉयल्सने प्रथम कर्णधार संजू सॅमसनला संघात कायम ठेवले आहे. कर्णधार संजू सॅमसनशिवाय राजस्थान रॉयल्सने यशस्वी जैस्वालला संघात कायम ठेवले आहे. रियान पराग, ध्रुव जुरेल हेही संघात कायम आहेत. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरलाही कायम ठेवण्यात आले आहे. मोठी गोष्ट म्हणजे संदीप शर्मालाही कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सामील झालेला १३ वर्षीय भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशी याला राजस्थान संघाने १ कोटी रूपये खर्चून संघात सामील केलं आहे. त्याची लिलावातील मूळ किंमत ३० लाख होती.
राजस्थानच्या ताफ्यातील रिटेन केलेले खेळाडू आणि किंमती
संजू सॅमसन – १८ कोटी
यशस्वी जैस्वाल – १८ कोटी
रियान पराग – १४ कोटी
ध्रुव जुरेल – १४ कोटी
शिमरॉन हेटमायर – ११ कोटी
संदीप शर्मा – ४ कोटी
राजस्थान रॉयल्सचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Rajasthan Royals IPL 2025 Full Squad)
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्ष्णा, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, युधवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सुर्यवंशी, क्वेना मफाका, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे.
राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Rajasthan Royals Match Schedule)
२३ मार्च – सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स
२६ मार्च – राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
३० मार्च – राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स
५ एप्रिल – पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
९ एप्रिल – गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स
१३ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१६ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स
१९ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स
२४ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स
२८ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स
१ मे – राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स
४ मे – कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स
१२ मे – चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
१६ मे – राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स