Kumar Sangakkara Statement on Sanju Samson Controversial Catch: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ८६ धावा करत झेलबाद झाला. संजूने षटकारासाठी पाठवलेल्या चेंडूचा सीमारेषेजवळ शाई होपने झेल टिपला, यावर संजू आणि संघाचे मत होते की त्याचा पाय सीमारेषेला लागला आहे का, हे पुन्हा तपासावं अशी इच्छा होती. तर याचदरम्यान संघाचे प्रशिक्षक असलेल्या कुमार संगकारा यांची प्रतिक्रियाही लक्ष वेधून घेणारी होती. संजूच्या या वादग्रस्त कॅचबद्दल आपले मत मांडले आहे.
कुमार संगकारा म्हणाला, मैदानावरील पंचांना टीव्ही अंपायर जे सांगतील ते ऐकावे लागते. खेळाडूंनीही याचे पालन केले पाहिजे आणि थेट चर्चा करून किंवा पंच अहवालाद्वारे आपले मत व्यक्त करण्याचे माध्यम आहे. आम्ही प्रोटोकॉलचे पालन करतो; खेळाडू आणि पंचांवर खूप दबाव असतो. आम्ही ते शक्य तितके सहजतेने हाताळण्याचा प्रयत्न करतो.”
हेही वाचा-IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
संगकारा म्हणाला, “हे रिप्ले आणि अँगलवर अवलंबून असते. कधी कधी तुम्हाला असे वाटते की तुमच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाला आहे. पण अशावेळी थर्ड अंपायरलाही निर्णय घेणे कठीण होते. खेळ निर्णायक वळणावर होता, पण शेवटी जे व्हायचं ते झालं. आमची मतं भिन्न आहेत पण अखेरीस आपल्याला तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयावर ठाम राहावे लागेल. तरीही जर आमचं मत वेगळं असेल तर आम्ही थेट पंचांशी चर्चा करू शकतो. या सर्व गोष्टी असल्या तरी दिल्ली संघ चांगला खेळला.
संजू सॅमसनने आपल्या डावात ४६ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या. विस्फोटक फलंदाज ठरलेल्या सॅमसनला शाई होपने सीमारेषेच्या अगदी जवळ झेलबाद केले. थर्ड अंपायरकडेही हा निर्णय गेला आणि त्यांनी सॅमसनला बाद घोषित केले. यानंतर आरआरला डीसीकडून २० धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.