Lucknow Super Kings vs Sunrisers Hyderabad Score Updates: आयपीएल २०२३चा ११वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. गुवाहाटीच्या क्रिकेट मैदानावरील या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला. यावेळी राजस्थानच्या युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर यादोघांनी मिळून दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढत विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
पहिल्याच षटकात चौकारांचा पाऊस पाडला आणि खास विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, तो अशी कामगिरी करणारा १५वा खेळाडू ठरला. झाले असे की, शनिवारी (दि. ८ एप्रिल) राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघातील नाणेफेक दिल्लीने जिंकली होती. तसेच, गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थान संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर क्रीझवर उतरले होते. यावेळी दिल्लीकडून खलील अहमद पहिले षटक टाकत होता.
राजस्थानने दिल्लीसमोर ठेवलेले डोंगराएवढे २०० धावांचे लक्ष्य फार सोपे नसणार आहे. आरआरने निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून १९९ धावा केल्या. जॉस बटलरने ५१ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७९ धावांची तुफानी खेळी केली. यशस्वी जैस्वालने ३१ चेंडूत ६० धावा केल्या. त्याने ११ चौकारसह एक षटकारही लगावला. त्याचवेळी शिमरॉन हेटमायरने २१ चेंडूंत ३९ धावा करून नाबाद राहिला. दिल्लीकडून मुकेश कुमारने २, रोवमन पॉवेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.
या सामन्यात दिल्ली संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत, तर राजस्थान संघातही काही बदल झाले आहेत. मिचेल मार्श स्वतःच्या लग्नासाठी मायदेशी परतला आहे. त्याच्या जागी रोवमन पॉवेल खेळणार आहे, तर सरफराज खानच्या जागी ललित यादव आणि पृथ्वी शॉच्या जागी मनीष पांडेला संधी मिळाली आहे.पृथ्वी शॉचा प्लेइंग-११ मध्ये प्रभावशाली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी, राजस्थानसाठी चांगली गोष्ट म्हणजे जॉस बटलर हे सामने खेळत आहे, पण यशस्वी जैस्वालला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी ध्रुव जुरेल खेळत आहे. राजस्थान रॉयल्सने गुवाहाटीला दोन सामन्यांसाठी त्यांचे होम ग्राउंड म्हणून स्वीकारले होते, परंतु संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला. अशा स्थितीत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ येथे शेवटचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. राजस्थान संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे, ज्यांनी आपले पहिले दोन सामने गमावले आहेत.
यशस्वी जयसवालचा विक्रम
खलीलने चेंडू टाकण्यास सुरुवात करताच जयसवालनेही जोरदार फटके मारण्यास सुरुवात केली. खलीलच्या पहिल्या तिन्ही चेंडूवर जैस्वालने ३ चौकार मारले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव सुटला. पुढे पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा चौकारांची बरसात केली. चौकारांची बरसात केल्यानंतर जयसवालच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. तो आयपीएलमध्ये एका षटकात पाच किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा १५वा खेळाडू ठरला.