Rajasthan Royals vs Gujarat Titans Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या ४८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघ गुजरात टायटन्स विरुद्ध ११८ धावांवर ऑलआऊट झाला. संघाचे सर्व स्टार फलंदाज आपली जादू दाखवू शकले नाहीत. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. यानंतर गुजरातच्या राशिद खान आणि नूर अहमद या फिरकीपटूंसमोर राजस्थानचे सर्व फलंदाज ढेपाळले. धावांचा पाठलाग करताना गुजरातने १३ षटकात ९ गडी राखून राजस्थान रॉयल्सचा सुपडा साफ केला. या दणदणीत विजयासह ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचले आहे. दुसरीकडे राजस्थानला रनरेटमध्ये खूप मोठा फटका बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, अखेरीस संघासाठी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फलंदाजीत हात आजमावण्याचा नक्कीच प्रयत्न केला. यादरम्यान त्याने १५व्या षटकात नूर अहमदला षटकार ठोकला पण त्याच्या शॉटने सीमारेषेवर बसलेल्या कॅमेरामनला दुखापत झाली. खरं तर, कॅमेरा बोल्टचा शॉट चित्रित करत होता, परंतु तो स्वत: ला वाचवण्याआधीच चेंडू त्याच्यावर आदळला. चेंडू कॅमेरामनच्या डोक्याला लागताच तो खाली कोसळला आणि रक्तबंबाळ झाला. यादरम्यान कॅमेरामनसह गुजरात टायटन्सचे काही सपोर्ट स्टाफ त्याच्याकडे धावत आले आणि त्यांनी त्याला हाताळले.

हेही वाचा: IPL 2023 RR vs GT: राजस्थान रॉयल्सचा सुपडा साफ! गुजरात टायटन्सचा तब्बल नऊ गडी राखून दणदणीत विजय

राशिद खानची मनाला भावणारी कृती

गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खान कॅमेरामनची मनापासून चौकशी करण्यासाठी गेला आणि गुजरात टायटन्सचा फिजिओ त्याच्याकडे धावत आला. राशिदची ही भावनिक कृती सर्व क्रिकेट रसिकांना भावून गेली. त्यामुळे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दमदार षटकारानंतर ट्रेंट बोल्ट जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. बोल्ट ११ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने एक षटकार आणि एक चौकारही लगावला.

राशिद आणि नूरने कमाल दाखवली

गोलंदाजीत राशिद खान आणि नूर अहमद या फिरकीपटूंनी गुजरातसाठी आपली चमक दाखवली. राशिद खानने चार षटकांत १४ धावा देत एकूण तीन बळी घेतले. याशिवाय नूर अहमदच्या खात्यात २ विकेट्स जमा झाल्या. नूर अहमदने तीन षटके टाकली ज्यात त्याने २५ धावा दिल्या. याशिवाय मोहम्मद शमी, कर्णधार हार्दिक पांड्या आणि जोशुआ लिटल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेत संघासाठी काम केले. इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. मोसमातील पहिल्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ भिडले ज्यात राजस्थान संघ विजयी झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rr vs gt cameraman hit trent boults six over midwicket rashid khan jumped over the fence to check avw