Jos Buttler equaled KL Rahul’s record : आयपीएल २०२४ मधील २४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा६ गडी राखून पराभव केला. या हंगामातील राजस्थानचा हा सलग चौथा विजय आहे. संजू सॅमसनच्या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आरसीबीचा हा पाच सामन्यातील चौथा पराभव आहे. या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहलीने तर राजस्थानकडून जोस बटलरने शतक झळकावले. बटलरने षटकार मारून सामना संपवला आणि त्याचे शतकही पूर्ण केले. आयपीएलमधला हा त्याचा १०० वा सामना होता आणि त्याने शतकी खेळी करून तो संस्मरणीय बनवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जोस बटलर केएल राहुलच्या खास क्वबमध्ये सामील –

जोस बटलरने आपल्या १००व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावून एक विशेष कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. आपल्या पहिल्या १००व्या सामन्यात शतक झळकावणारा खेळाडू केएल राहुल आहे. २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना, राहुलने ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद १०३ धावा केल्या होत्या. आता या यादीत बटलरच्या नावाचाही समावेश झाला आहे.

जोस बटलरने गेलच्या विक्रमाशी केली बरोबरी –

एकीकडे विराट कोहलीने आयपीएलमधील आठवे शतक झळकावले, तर दुसरीकडे बटलरने सहावे शतक झळकावले. बटलर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा संयुक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलची बरोबरी केली. गेलने आयपीएलमध्ये ६ शतके झळकावली होती. केएल राहुल, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांची प्रत्येकी ४ शतके आहेत.

हेही वाचा – IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल

कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद –

विराट कोहलीचा संघ त्याच्या आठ शतकांमध्ये तिसऱ्यांदा पराभूत झाला आहे. आयपीएलमध्ये पराभूत झालेल्या सामन्यात सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला. या नकोशा रेकॉर्डमध्ये त्याने हाशिम आमला आणि संजू सॅमसनला मागे टाकले आहे. आमला आणि सॅमसन यांनी प्रत्येकी २ शतके झळकावली होती, तेव्हा त्यांच्या संघाला पराभूत व्हावे लागले होते.