Virat Kohli scored his eighth century in IPL : आयपीएल २०२४ मधील १९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीकडूव विराट कोहलीने आयपीएलमधील आपले आठवे शतक झळकावले आहे. त्याचबरोबर तो आयपीएलच्या १७व्या हंगामात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ६७ चेंडूत आपले शतक झळकावले. तसेच तो आयपीएलमध्ये ७५०० धावांचा टप्पा गाठणाराही पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीच्या ११३ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर आरसीबीने राजस्थान रॉयल्ससमोर १८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कोहली आणि फाफ डुप्लेसिसने शानदार शतकी भागीदारी करून सॅमसनचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. या दोन फलंदाजांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ३ बाद १८३ धावा केल्या. राजस्थानकडून फिरकीपटू युजवेंद्र चहलने चार षटकांत ३४ धावा देत दोन बळी घेतले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी संयुक्त दुसरी जोडी –

विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस या सलामीच्या जोडीने आरसीबीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी पॉवरप्ले संपेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सहा षटके संपल्यानंतर आरसीबीने एकही विकेट न गमावता ५३ धावा केल्या होत्या. पॉवरप्ले दरम्यान आरसीबीने एकही विकेट गमावली नसल्याची या मोसमातील ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी विराट कोहली पॉवरप्लेमध्ये या हंगामातक सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या कालावधीत कोहलीने आतापर्यंत १२१ धावा केल्या आहेत. या दोन फलंदाजांमधील ही शतकी भागीदारी लवकरच पूर्ण झाली. कोहली आणि डुप्लेसिस यांनी आयपीएलमध्ये पाचव्यांदा शतकी भागीदारी केली आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी संयुक्त दुसरी जोडी बनली.

विराट कोहलीने आठवे शतक झळकावले –

विराट कोहलीने राजस्थानविरुद्ध आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि आयपीएलच्या चालू हंगामातील पहिले शतक झळकावले. या हंगामात शतक झळकावणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे आठवे शतक आहे. कोहलीने ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसचे राजस्थान रॉयल्सविरुद्धचे अर्धशतक हुकले.

हेही वाचा – RR vs RCB : ‘आजा-आजा… ऐसा मौका फिर कहा मिलेगा…’, विराट कोहलीने आवेश खानची घेतली मजा; पाहा VIDEO

विराटने आयपीएलमध्ये ७५०० हजार धावा पूर्ण केल्या –

राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने संघाला पहिले यश मिळवून दिले. डुप्लेसिस ३३ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला. यासह कोहली आणि डुप्लेसिस यांच्यातील पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी तुटली. आयपीएलमधील आरसीबीसाठी ही ४७वी शतकी भागीदारी होती, जी चहलने संपुष्टात आणली. यानंतर नांद्रे बर्गरने राजस्थान रॉयल्सला दुसरे यश मिळवून दिले. ग्लेन मॅक्सवेल तीन चेंडूत एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर चहलने पुन्हा एकदा आपल्या शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत पदार्पण सामना खेळत असलेल्या सौरव चौहानला नऊ धावांच्या स्कोअरवर बाद केले. मात्र, दुसऱ्या टोकापासून कोहली खंबीरपणे उभा राहिला आणि शानदार शतक झळकावून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. या दरम्या विराटने ३४ धावा करता आयपीएलमध्ये ७५०० हजार धावाचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे.