Ruturaj Gaikwad and Devon Conway Partnership: आयपीएल २०२३ मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 67 वा लीग सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २२३ धावा केल्या. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी शानदार अर्धशतकं झळकावली. त्याचबरोबर दोघांनी आपल्या भागीदारीच्या जोरावर एक विक्रम केला. या दोघांनी यंदाच्या हंगामात सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव नोंदवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी ८७ चेंडूत १४१ धावांची भागीदारी केली. आयपीएल २०२३ मधील ही चौथी सर्वात मोठी भागीदारी आहे. आरसीबीच्या विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने या मोसमातील आतापर्यंतची सर्वात मोठी १७२ धावांची भागीदारी केली आहे, जी त्यांनी हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात केली होती. त्याचवेळी गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही मोसमातील सर्वात मोठी भागीदारी करणारी चौथी जोडी ठरली.

दोघांनी वेगवान खेळी खेळल्या –

दिल्ली विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात डेव्हॉन कॉनवेने ५२ चेंडूत ८७ धावा केल्या. त्याच्या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी, ऋतुराज गायकवाडने ५० चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७९ धावांची खेळी केली. गायकवाडने १५८ च्या स्ट्राइक रेटने आणि डेव्हॉन कॉनवेने १६७.३१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

हेही वाचा – CSK vs DC: गुरु पेक्षा शिष्य ठरला वरचढ! ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी केला ‘हा’ खास पराक्रम

आयपीएल २०२३ मधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भागीदाऱ्या –

१. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस (आरसीबी) – १७२ धावा.
२. मुंबई इंडियन्स विरुद्ध विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (आरसीबी) – १४८ धावा.
३. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा (गुजरात टायटन्स) – १४२ धावा.
४. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे (सीएसको– १४१ धावा.

सामन्याबद्दल बोलायचे, तर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ३ गडी गमावून २२३ धावा केल्या. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. मात्र, डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी २२४ धावा कराव्या लागतील.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad and devon conway registered the fourth highest partnership in ipl 2023 against delhi for the first wicket vbm