Ruturaj Gaikwad breaks Michael Hussey’s record: आयपीएल २०२३ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. प्लेऑफच्या तिकिटासाठी सीएसकेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे आवश्यक आहे. संघाची सुरुवातही अशीच झाली आणि त्याचे संपूर्ण श्रेय त्यांचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला जाते. ज्याने ५० चेंडूत ७९ धावांची शानदार खेळी केली. ऋतुराजने आपल्या खेळीत तीन चौकार आणि सात षटकार मारले. या खेळीसह त्याने आयपीएलमध्ये एक विक्रम केला आहे. ज्यामध्ये त्याने स्वतःच्या गुरूला मागे टाकले आहे.
ऋतुराज गायकवाडच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर या सामन्यात त्याने १३वे अर्धशतक झळकावले. याशिवाय एक शतकही त्याच्या नावावर आहे. म्हणजेच एकूण १४ वेळा आयपीएलमध्ये त्याने ५० किंवा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याचा हा ५० वा आयपीएल सामना होता.
आतापर्यंत तो या लीगमध्ये फक्त सीएसकेकडून खेळला आहे. म्हणजेच, त्याने फक्त सीएसकेसाठी सर्व १४ फिफ्टी प्लस स्कोअर केले आहेत. या प्रकरणात त्याने चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीला मागे टाकले आहे. या प्रकरणात, फाफ डू प्लेसिस शीर्षस्थानी आहे, जो सध्या आरसीबीचा कर्णधार आहे आणि या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. हा विक्रम फक्त सलामीवीरांचा आहे.
सीएसकेसाठी सर्वाधिक ५० हून अधिक धावा करणारे सलामीवीर –
१६ – फाफ डु प्लेसिस
१४ – ऋतुरात गायकवाड
१३ – मायकेल हसी
ऋतुराजसाठी हा हंगाम कसा होता?
ऋतुराज गायकवाडसाठी हा मोसम चांगला गेला आहे. मध्यंतरी त्याची कामगिरी थोडी कमी झाली, असली तरी त्याने चांगली सुरुवात केली. या मोसमात त्याने ५०० धावांचा टप्पाही पार केला आहे. त्याने आतापर्यंत १३ डावात ५०४ धावा केल्या असून त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. या हंगामात त्याची सरासरी ४० च्या वर आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट देखील १५० च्या आसपास आहे. त्याने ५० आयपीएल सामन्यांमध्ये एकूण १७११ धावा केल्या आहेत.