Chennai Super Kings vs Punjab Kings Highlights: चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांच्या जोरावर आणि रवींद्र जडेडाच्या शानदार अष्टपैलू खेळीच्या जोरावर सीएसकेने पंजाबवर विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान अधिक पक्के केले आहे. या विजयासह चेन्नईने काही दिवसांपूर्वी पंजाबने केलेल्या पराभवाचा बदला घेतला. यामध्ये जडेजाच्या ४३ धावा आणि ३ विकेट्सने मोठी भूमिका बजावली. पण या सामन्यापूर्वी सीएसकेचे काही खेळाडू आजारी होते, त्यामुळे सामन्यात कोण खेळणार हेही सकाळपर्यंत नक्की नव्हतं, याबाबत ऋतुराजने वक्तव्य केले आहे.
विजयानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला, “सर्वांना वाटले की विकेट स्लो आहे आणि चेंडू फारसा उसळी घेणार नाही. पण आम्हाला चांगली सुरुवात मिळाली, त्यामुळे आम्ही १८०-२०० धावा करण्याचा विचार करत होतो. पण विकेट गमावल्यानंतर १६०-१७० धावा ही चांगली धावसंख्या होती.”
चेन्नईच्या विजयानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?
त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या सिमरजीत सिंगचे कौतुक करताना ऋतुराज म्हणाला, “तो (सिमरजीत सिंग) काय करतो हे मला माहीत नाही, पण गेल्या सीझनमध्येही तो १५० किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकत होता. त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत, पण उशीरा का होईना त्याला संधी मिळाली. आम्ही फलंदाजाला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून घेण्याचा विचार करत होतो, पण नंतर आम्हाला वाटले की फलंदाज १०-१५ धावा देईल, पण तो २-३ विकेट घेऊ शकतो. काही खेळाडू फ्लू झाला होता. त्यामुळे सकाळपर्यंत कोण खेळणार आणि कोण नाही हेही नक्की नव्हतं. पण सामना जिंकल्याचा खूप आनंद आहे.”
चेन्नईने दिलेल्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने झटपट विकेट गमावल्या. सीएसकेच्या गोलंदाजीच्या माऱ्यापुढे पंजाबचा संघ केवळ ९ बाद १३९ धावाच करू शकला आणि चेन्नईने २८ धावांनी विजय मिळवला. यासह चेन्नईचा १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.