Hardik Pandya Press Conference : आयपीएलच्या १६ व्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात झाली असून आयपीएलच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराजने गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ९२ धावांची वादळी खेळी केली होती. परंतु, गुजरात टायटन्से चेन्नईचा ५ गडी राखून पराभव केल्याने ऋतुराजची खेळी फेल ठरली. विरोधी संघाचा कर्णधाक हार्दिक पांड्याने ऋतुराजबाबत मोठं विधान केलं. हार्दिकने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळत म्हटलं की, भारतीय क्रिकेटसाठी ऋतुराज कमाल करेल. ऋतुराजने ५० चेंडूंच्या इनिंगमध्ये चार चौकार आणि नऊ षटकार ठोकले. ऋतुराजच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नईच्या संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारता आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामना संपल्यानंतर हार्दिकने पत्रकार परिषदेत म्हटलं की, “ऋतुराजने जे फटके मारले, ते खूप जबरदस्त होते. त्याने जर अशाच प्रकारची चमकदार कामगिरी केली, तर तो भारतीय क्रिकेटसाठी कमाल करेल. वेळ आल्यावर भारतीय क्रिकेट टीम त्याच्यासोबत असेल. तो किती जबरदस्त खेळाडू आहे, हे आम्हाला माहित आहे. चेन्नई २२० ते २३० धावांपर्यंत मजल मारेल, असं आम्हाला वाटत होतं. आम्हाला ऋतुराजला गोलंदाजी करण्यात अडचण निर्माण होत होती. मला तर असं वाटत होतं की, आम्ही त्याला बाद करू शकत नाही.

नक्की वाचा – इम्रान खान यांची बीसीसीआयवर टीका, म्हणाले, “मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना…”

गुजरात टायटन्सच्या कामगिरीबाबत बोलताना हार्दिक म्हणाला, माझी आणि शुबमन गिलची विकेट गेल्यानंतर आमचा संघ संकटात सापडल्यासारखं वाटत होतं. पण राहुल तेवतियाने पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी केली आणि राशिदनेही दाखवलं की, तो काय करु शकतो.”जुलै २०२१ मध्ये पदार्पण केल्यानंतर ऋतुराज गायकवाडने ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये ऋतुराजने एकूण १३५ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad will be a superstar in indian cricket hardik pandya big statement in press conference ipl 2023 nss