सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग हे एका युगातील दोन महान खेळाडू यापूर्वी एकमेकांसमोर मैदानात ठाकलेले सर्वानीच पाहिले आहे, पण आयपीएलच्या निमित्ताने या दोन्ही खेळाडूंना चाहत्यांनी पहिल्यांदाच एकत्र सराव करताना पाहिले. आयपीएलमधल्या पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे.
सचिनने यावेळी नेट्समध्ये फलंदाजीचा भरपूर सराव केला, तर संघाचा कर्णधार पॉन्टिंग, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी ४५ मिनिटे फलंदाजीचा सराव केला. यावेळी सचिनचा सराव पॉन्टिंग जवळून पाहत होता. यावेळी संघाचे मुख्य मार्गदर्शक अनिंल कुंबळे यांच्याबरोबर या दोघांनी चर्चाही केली.

Story img Loader