Ricky Ponting on Sachin: क्रिकेटचा देव म्हटला जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर २४ एप्रिल २०२३ रोजी आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. याआधी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने त्याचे जोरदार कौतुक केले होते. पाँटिंगने तांत्रिकदृष्ट्या सचिनला सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे. पाँटिंग म्हणाला की, “सचिनकडे गोलंदाजांच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर आहे.”

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सचिन तेंडुलकरला तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून संबोधत म्हटले की, “गोलंदाजांच्या प्रत्येक आव्हानाला त्याच्याकडे उत्तर आहे. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्यानंतरच विराट कोहलीची तेंडुलकरशी तुलना करणे योग्य ठरेल, असे पाँटिंगने म्हटले आहे.”

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त ‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये पाँटिंग म्हणाला, “मी याआधीही सांगितले आहे की, तंत्राच्या बाबतीत सचिन हा मी पाहिलेला किंवा त्याच्या विरुद्ध खेळलेला सर्वोत्तम फलंदाज आहे. बॉलिंग युनिट म्हणून आम्ही जी काही रणनीती बनवायची, त्या रणनीतीला त्याच्याकडे उत्तर होते. मग ते भारतात असो वा ऑस्ट्रेलिया. खेळाडूंचे मानांकन किंवा मूल्यांकन करणे कठीण आहे कारण प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने खेळतो. पण ज्या युगात मी खेळलो त्या काळात सचिन तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट फलंदाज होता.”

हेही वाचा: MS Dhoni, IPL 2023: “हे मला फेअरवेल देण्यासाठी आले होते…” माहीने हसत हसत दिला संकेत, चाहत्यांच्या मनातील धडधड वाढली

‘आता फलंदाजी सोपी झाली’- रिकी पाँटिंग

तेंडुलकर आणि कोहली यांच्या तुलनेबाबत पाँटिंग म्हणाला की, “विराटने सचिनच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात खेळायला सुरुवात केली होती पण आता खेळ बदलला आहे. वेगवेगळे नियम आहेत, उदाहरणार्थ, ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये वर्तुळाबाहेर कमी क्षेत्ररक्षक असतात, दोन नवीन चेंडू घेतले जातात आणि आता फलंदाजी करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.” ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाले की, “तेंडुलकरच्या काळात जुना चेंडू रिव्हर्स स्विंग होत असल्याने तो खेळणे खूप अवघड होते. म्हणूनच तो आमच्या आणि आताच्या काळातही सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे.”

हेही वाचा: CSK vs KKR: “तो जे काही म्हणतो ते तुम्ही…” रहाणेने उघड केले त्याच्या ‘बॅक टू बॅक’ धडाकेबाज खेळीचे रहस्य, धोनीच्या कॅप्टन्सीवरही मोठे विधान

‘नंतर वन डेमध्ये ५० षटकांनंतर चेंडूचा आकार बदलायचा’

पाँटिंगच्या म्हणण्यानुसार, “सचिन जेव्हा एकदिवसीय सामने खेळायचा तेव्हा ५० षटकांनंतर चेंडूचा आकार बदलायचा. त्याला रिव्हर्स स्विंग मिळायचे जे आज दिसत नाही. विराट हा अतिशय गुणवान खेळाडू आहे. त्याच्या नावावर ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सचिनने १०० शतके झळकावली आहेत. विराटची कारकीर्द संपल्यानंतर दोघांची तुलना करणे योग्य ठरेल. तो किती वर्षे खेळू शकतो या आधारे मी खेळाडूच्या क्षमतेचे मूल्यांकन करतो. हा योग्य दृष्टिकोन आहे कारण एवढ्या मोठ्या कालावधीत सातत्याने चांगले खेळणे सोपे नसते. काही खेळाडू येतात आणि तीन-चार वर्षे जगातील सर्वोत्तम खेळाडू दिसतात पण ते जास्त काळ टिकणे कठीण असते आणि सचिनने वीस वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने चांगला खेळ केला आहे, त्यामुळे त्याची तुलना होऊ शकत नाही.”