आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २६ वा सामना चांगलाच अविस्मरणीय ठऱला. या सामन्यामध्ये मुंबईचा १८ धावांनी पराभव झाला असून लखनऊचा कर्णधार केएल राहुलने धडाकेबाज शतकी खेळी केली आहे. मुंबईचा या हंगामातील सलग सहावा पराभव आहे. दरम्यान, मुंबईचा मार्गदर्शक सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या सामन्यात संधी दिली जाईल असे म्हटले जात होते. मात्र या समन्यात त्याला प्रत्यक्ष संधी दिली गेली नाही. असे असले तरी आज अर्जुन तेंडुलकर खास चर्चेचा विषय ठरला. कारण एकीकडे सामना सुरु असताना अर्जुन तेंडुलकर त्याच्या वडिलांजवळ म्हणजेच सचिन तेंडूलकरजवळ बसून धडे घेत होता. या दोघांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

सचिन तेंडूलकर आणि अर्जुन तेंडुलकर या दोघांचे डग आऊटमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या बाजुला बसलेले दिसत आहेत. सचिन तेंडुलकर हा अर्जुन तेंडुलकर तसेच जहीर खानसोबतही बसलेला दिसतोय. मात्र अर्जुन आणि सचिन एकमेकांजवळ बसल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. सामना सुरु असताना या दोघांमध्ये काही चर्चा होत असल्याचेही दिसले. सचिन तेंडुलकर अर्जुनला यावेळी काही धडे देत असावा असा अंदाज बांधला जात आहेत.

दरम्यान, लखनऊ आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये लखनऊचा १८ धावांनी विजय झाला. लखनऊने मुंबईसमोर १९९ धावांचा डोंगर उभा केला होता. तलेच लखनऊचा कर्णधार केएल राहुलने दमदार शतक झळकावत नाबाद १०३ धावा केल्या. दुसरीकडे १९९ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईचा संघ वीस षटकांत १८१ धावा करु शकला.

Story img Loader