IPL 2023 DC vs MI Match Updates: आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक कॅमेरॉन ग्रीन आहे, ज्याला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समाविष्ट केले आहे, परंतु आतापर्यंत या खेळाडूला चांगली कामगिरी करता आलेली नाही. १७.५० कोटींच्या या खेळाडूने आतापर्यंत दोन सामन्यांत केवळ १७ धावा केल्या आहेत. आता या ऑस्ट्रेलियन खेळाडूला सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाची गरज पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिनने कॅमेरून ग्रीनला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे, ज्याद्वारे तो जोरदार पुनरागमन करू शकतो. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर युवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर कॅमेरून ग्रीनला फलंदाजीचे काही तंत्र शिकवताना दिसत आहे. कॅमेरून ग्रीनने नंतर मीडियाशी संवाद साधताना या संवादाविषयी सांगितले की, सचिनने त्याला सांगितले की, जर तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असाल, तर चेंडू खाली ठेवण्यासाठी बॅटचे तोंड बंद करावे लागते. त्याचबरोबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हवेत शॉट मारण्यासाठी बॅटचे तोंड उघडावे लागते.

जेव्हा सचिन बोलतो तेव्हा तुम्ही फक्त ऐकता: कॅमेरून ग्रीन

कॅमेरून म्हणाला की, जेव्हा सचिन बोलतो, तेव्हा तुम्ही फक्त ऐकता. त्याने मला बॅटचे तोंड उघडे ठेवून खेळण्याचा सल्ला दिला आहे. या ऑस्ट्रेलियन युवा खेळाडूची अप्रतिम प्रतिभा आणि फॉर्म पाहून मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते, परंतु या खेळाडूने आतापर्यंत ८.५०च्या सरासरीने आणि ११३.३३च्या स्ट्राईक रेटने केवळ १७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत केवळ १ बळी घेण्यात तो यशस्वी ठरला आहे.

हेही वाचा – Vamika Kohli: विराट-अनुष्काने मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला केले माफ; उच्च न्यायालयाने रद्द केला एफआयआर

मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि डेव्हिड वॉर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सची अवस्था यंदाच्या मोसमात खूपच खराब झाली आहे. या दोन्ही संघांनी या मोसमात आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही, मात्र मंगळवारच्या सामन्यात दोन्ही संघांपैकी एक संघ नक्कीच जिंकेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar gives batting tips to mumbais cameron green before the match against delhi vbm