Sachin Tendulkar Instagram Story for SRH Openers: सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज यंदाच्या मोसमात रेकॉर्डब्रेकिंग खेळी खेळण्यासाठीच जणू मैदानात उतरतात. आयपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रमही यंदा हैदराबादने मोडला. हैदराबादचे सलामीवील ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा तर तुफान फॉर्मात आहे. पॉवरप्लेमध्ये चेंडू फक्त चौकार-षटकारासाठी धाडायचा, एवढा एकच उद्देश घेऊन हे दोघे मैदानात उतरतात. पण लखनऊविरूद्धच्या सामन्यात तर या दोघांनीही कमालच केली. १६७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत एकही विकेट न गमावता या दोघांनीही संघाला एकहाती विजय मिळवून दिला. ही फलंदाजी पाहून स्वत: सचिन तेंडुलकरही भारावला आहे, त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने लक्ष वेधलं आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सचिन तेंडुलकरने ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि खाली लिहिले, “आजच्या या सलामीवीरांच्या भागीदारीला एक विस्फोटक फलंदाजी म्हणणे ही साधारण ठरेल. हेड आणि अभिषेक जर पहिल्या डावात फलंदाजीला उतरले असते तर त्यांनी ३०० धावांचा पल्ला गाठला असता.” या दोघांची फलंदाजी पाहून सचिन तेंडुलकरही भारावला. 

लखनऊच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात एसएसजीने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावा केल्या होत्या. तर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूत ८९ धावा आणि अभिषेक शर्माने २८ चेंडूत ७५ धावा केल्या. तर हेडने १६ चेंडूत आणि अभिषेकने १९ चेंडूत आपली अर्धशतके पूर्ण केली होती. या खेळीमुळे एसआरएचने केवळ ५८ चेंडूत हे लक्ष्य सहज गाठले. आत्तापर्यंत सर्वात जास्त चेंडू बाकी असताना जिंकलेला संघ दिल्ली कॅपिटल्स आहे. ज्यांनी IPL 2024 मध्येच गुजरात टायटन्सचा ६७ चेंडू बाकी असताना पराभव केला होता. आता SRH या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. ज्यांनी लखनऊचा ६२ चेंडू बाकी असताना १० विकेट्सने पराभव केला आहे.