Sachin Tendulkar’s Twitter Q&A Session: जागतिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर २१ एप्रिल रोजी चाहत्यांसह प्रश्नोत्तरांच्या सत्रात रमला. सचिनने पहिल्यांदाच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #AskSachin च्या माध्यमातून चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. येथे पदार्पणाची घोषणा करताना सचिनने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, ज्यात २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना विराट कोहलीला काय बोलले होते तेही सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यादरम्यान त्याला त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, २०११ वर्ल्ड कप, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली आणि ट्विटर ब्लू टिकसह इतर मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा अर्जुनने अलीकडेच आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करताना इतिहास घडवला. लीगच्या इतिहासात खेळणारी दोघेही पहिली पिता-पुत्र जोडी ठरली. अशा परिस्थितीत अर्जुनबद्दल प्रश्न विचारणे साहजिकच होते.

एका चाहत्याने दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा मिठी मारताना दिसत आहेत. अर्जुनने आयपीएलमध्ये पहिला विकेट घेतल्याचा दुसरा फोटो आहे. यादरम्यान ज्युनियर तेंडुलकरला रोहितने मिठी मारली. चाहत्याने सचिनला विचारले, हे दोन फोटो पाहून त्याच्या मनात काय येते? सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया देत म्हटले की, “आम्ही मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळलो असतो. एका चाहत्याने विचारले की अर्जुन तेंडुलकरने त्याला कधी आऊट केले आहे का? सचिनने उत्तर दिले, “होय, एकदा लॉर्ड्सवर, पण अर्जुनला त्याची आठवण करून देऊ नका.”

२०११ च्या विश्वचषक फायनलमध्ये विराट कोहलीला काय सल्ला दिला होता?

एका चाहत्याने २०११ च्या वर्ल्ड कप फायनलचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीशी बोलताना दिसत आहे. याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला, तो कोहलीला काय म्हणाला? यावर उत्तर देताना सचिन तेंडुलकर म्हणाला, आताही चेंडू थोडा स्विंग होत आहे!

हेही वाचा – IPL 2023 Delhi Capitals: इशांत शर्माच्या शानदार पुनरागमनानंतर डेव्हिड वार्नरचे मोठं वक्तव्य; इंस्टावर पोस्ट शेअर करत म्हणाला,…

सचिन धोनीला एमएस आणि गांगुलीला दादी म्हणतो –

टीम इंडिया श्रीलंकेला हरवून चॅम्पियन बनली होती. सचिन तेंडुलकरने सांगितले की, तो नेहमी टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीला एमएस म्हणून संबोधतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे संपूर्ण जग दादाच्या नावाने ओळखले जाते, तर सचिन त्यांना प्रेमाने दादी म्हणतो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar made a revelation about his desire with arjun and virat during a question and answer session on twitter vbm
Show comments