Arjun Tendulkar Special Badge Viral Video : मुंबई इंडियन्समध्ये पदार्पण केल्यापासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये गोलंदाजीची छाप टाकली आहे, यात काही शंका नाही. पहिल्या सामन्यात त्याने दोन षटकात १८ धावा दिल्या. तर मंगळवारी झालेल्या सनरायझर्सविरोधात झालेल्या सामन्यात अर्जुनने २.५ षटकात १८ धावा देत एक विकेट घेतली. अर्जुनने भुवनेश्वर कुमारला बाद करून आयपीएलच्या पहिल्या विकेटवर शिक्कामोर्तब केलं. या प्रदर्शनानंतर डावखुरा युवा गोलंदाजाने एक मेसेज दिला की, तो त्याच्या खेळाचा स्तर वाढवत आहे. अर्जुनच्या या कामगिरीबद्दल मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने खास शैलीत त्याला शुभेच्छा दिल्या.
सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये मॅनेजमेंटकडून अर्जुनवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. स्पीचमध्ये म्हटलं की, नवीन चेंडूबाबत जसं आम्ही विचार केला होता, आमच्या खेळाडूंनी तशाचप्रकारे प्रदर्शन केलं. वेलडन अर्जुन, करिअरच्या दुसऱ्याच सामन्यात आणि तणावपूर्ण परिस्थितीत अर्जुनने चांगली कामगिरी केली, शाबाश अर्जुन..
इथे पाहा व्हिडीओ
त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ड्रेसिंग रुममध्ये टाळ्यांचा कडकडाट करत मुलगा अर्जुनच्या टी-शर्टवर मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटकडून प्लेयर ऑफ द मॅच चा बॅज लावला. यावेळी सचिनने खूप काही म्हटलं नाही. पण सचिनने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, “आमच्या कुटुंबात कमीत कमी एक विकेट तर आहे.”