MI vs LSG, Arjun Tendulkar Aggressive Video Gets Reaction: वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सचिन तेंडुलकरच्या लेकाला सुद्धा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. यंदाच्या हंगामातील अर्जुनचे हे पहिलेच षटक होते. या षटकात मार्कस स्टॉइनिसला धावबाद करण्याचे आव्हान स्वीकारले होते. आक्रमकरित्या गोलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर नेमका स्टॉइनिसच्या पॅडला चेंडू लागला होता पण हा बाद वाटल्याने अर्जुनने जोरदार अपील केली. खरंतर पंचांनी सुद्धा अर्जुनच्या बाजूने निकाल देत स्टॉइनिसला बाद दिले होते पण ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टॉइनिसने मोक्याच्या वेळी रिव्ह्यू घेतला व त्यात तो नाबाद सिद्ध झाला. हे सगळं घडत असताना अनेकदा अर्जुन हा स्टॉइनिसला खुन्नस देताना सुद्धा दिसून आला. सचिन तेंडुलकरच्या लेकाचा हा अंदाज स्वतः स्टॉइनिसला फार रुचला नाही हे त्याच्या अर्जुनकडे टाकलेल्या संतप्त लुकमधून स्पष्ट होत आहे. या काही सेकंदाच्या घडामोडीवरून ऑनलाईन सुद्धा चर्चा चालू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा