Sai Sudarshan breaks Sachin Tendulkar’s record : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शुक्रवारी सामना रंगला. या सामन्यात नाणेफेक जिंकून सीएसकेने गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जीटीचे सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतकं झळकावत चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. साई सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी खेळली. दरम्यान, त्याने एक मोठा पराक्रम केला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू ठरला. या बाबतीत त्याने ऋतुराज गायकवाडसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.

साईने ऋतुराजसह सचिनला टाकले मागे –

साई सुदर्शनची आयपीएलमधील ही २५ वी इनिंग होती. या इनिंगमध्ये त्याने आयपीएलमधील १००० धावा पूर्ण केल्या. यासह साई सुदर्शन सर्वात कमी डावात १००० धावा करणारा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाड यांच्या नावावर होता, ज्यांनी ३१व्या डावात ही कामगिरी केली होती. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे, तर शॉन मार्शच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने २१ व्या डावात एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. लेंडल सिमन्स २३ आणि मॅथ्यू हेडनने २५ व्या डावात एक हजार धावांचा आकडा गाठला आहे.

IND vs BAN Suryakumar Yadav surpassing Rohit Sharma in fastest Indian player to score 2500 runs in T20
IND vs BAN : सूर्याने रोहित शर्माला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ खास कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Sanju Samson Smashes First T20I Hundred in IND vs BAN and Broke Rohit Sharma Record
Sanju Samson: संजू सॅमसनचे पहिले टी-२० शतक, रोहितचा मोठा विक्रम मोडत ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज
Ravichandran Ashwin new records in IND vs BAN 2nd Test Mat
IND vs BAN : रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी! आतापर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
Virat Kohli 27000 runs complete in international cricket
IND vs BAN : विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
IND vs BAN Yashasvi Jaiswal Breaks Virender Sehwag Record After Hitting Fifty in 31 balls
IND vs BAN : यशस्वी जैस्वालने वादळी अर्धशतक झळकावत मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम, नोंदवला ‘हा’ खास पराक्रम
IND vs BAN India breaks England record for fastest team fifty
IND vs BAN : भारताने इंग्लंडचा रेकॉर्ड मोडत केला विश्वविक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला खास पराक्रम
Ravichandran Ashwin Breaks Anil Kumble Record of Most Test Wickets in Asia IND vs BAN
IND vs BAN: रविचंद्रन अश्विनच्या नावे ऐतिहासिक कामगिरी, अनिल कुंबळेंचा ‘हा’ मोठा विक्रम मोडत ठरला नंबर वन

शुबमन-साईची पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी –

साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी शानदार फलंदाजी करत ५१ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. हे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक आहे. आयपीएल २०२३ च्या फायनलमध्येही त्याने चेन्नईविरुद्ध दमदार फलंदाजी केली होती. पण दुर्दैवाने तो ९६ धावांवर बाद झाला. अंतिम फेरीत सुदर्शनने २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने या बरोबर शुबमन गिलसह पहिल्या विकेटसाठी विक्रमी २१० धावांची भागीदारी केली. ही आयपीएलमधील पहिल्या विकेटसाठी धावांची संयुक्त सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी २०२२ मध्ये केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी २१०* धावा जोडल्या होत्या.

हेही वाचा – GT vs CSK : आयपीएलमध्ये ‘शतक शंभरी’; शुबमन गिल, साई सुदर्शनने झळकावली वेगवान शतकं

सर्वात जलद १००० आयपीएल धावा करणारे भारतीय (डावाच्या बाबतीत)

२५* – साई सुदर्शन
३१ – सचिन तेंडुलकर
३१ – ऋतुराज गायकवाड
३३ – तिलक वर्मा
३४ – सुरेश रैना