Salman Khan’s old tweet viral : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४२ वा सामना शुक्रवारी पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळलेल्या सामन्यात पंजाबने कोलकातावर ८ विकेट्सनी विजय मिळवत इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २६२ धावांचे लक्ष्य दिले होते . मात्र प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने २६२ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जुने ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये सलमान खानने लिहिले होते की, झिंटाची टीम जिंकली आहे का? त्याचवेळी आता पंजाब किंग्सने सलमान खानच्या ट्विटला उत्तर दिले आहे.

“सामना पण जिंकला आणि हृदयही…”

सलमान खानचे व्हायरल ट्विट २०१४ चे आहे. पण कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पंजाब किंग्जच्या विजयानंतर ते चांगलेच व्हायरल होत आहे. पंजाब किंग्सने सलमान खानच्या जुन्या ट्वीटला उत्तर देताना रिट्वीट केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे झिंटाची टीम जिंकली आहे का? आता यावर प्रत्युत्तर देत पंजाब किंग्सने लिहिले आहे, “सामना पण जिंकला आणि हृदयही.” सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”

पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला –

पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्ससमोर २६२ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. जॉनी बेअरस्टोचे शतक आणि प्रभसिमरन सिंग-शशांक सिंग यांच्या झंझावाती खेळीमुळे हे लक्ष्य १८.४ षटकांत २ गडी राखून पूर्ण करण्यात आले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ६ गडी गमावून २६१ धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टोने ४८ चेंडूत १०८ धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय शशांक सिंग २८ चेंडूत ६८ धावा करून नाबाद परतला. तत्पूर्वी, प्रभसिमरन सिंगने २० चेंडूत ५४ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

Story img Loader