Mumbai Indians vs Punjab Kings Score Update: आयपीएलच्या १६व्या हंगामातील ३१व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (एमआय) आणि पंजाब किंग्स (पीबीकेएस) यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून २१४ धावांपर्यंत मजल मारली. संघाकडून सॅम करणने कर्णधार पदाला साजेशी खेळी करताना ५५ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर आपल्या टिकाकाराना चोख प्रत्युत्तर दिले.
पंजाबने पहिल्या ६ षटकात ५८ धावा केल्या –
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जच्या या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी मॅथ्यू शॉर्ट प्रभसिमरन सिंगसोबत मैदानावर उतरला. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी केवळ १८ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. पंजाबला पहिला धक्का शॉर्टच्या रूपाने बसला, जो ११ धावा करून कॅमेरून ग्रीनचा बळी ठरला.
सॅम करणने हरप्रीत सिंग भाटियासह धडाकेबाज खेळी करत संघाला २०० च्या पुढे नेले –
८३ धावांवर ४ विकेट गमावणाऱ्या पंजाबची धुरा कर्णधार सॅम करनने हरप्रीतसिंग भाटियासह सांभाळली. त्याचबरोबर वेगवान धावा करताना त्यांना मोठ्या धावसंख्येकडे नेण्याचे काम केले. पंजाब संघाने १५ षटकांचा खेळ संपेपर्यंत ४ गडी गमावून ११८ धावा केल्या होत्या. यानंतर अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या डावाच्या १६व्या षटकात सॅम करण आणि हरप्रीत सिंग भाटिया यांनी मिळून ३१ धावा करत धावसंख्या १४९ धावांपर्यंत नेली.
यानंतर पंजाब संघाने १७ व्या षटकात एकूण १३ धावा केल्या, त्यामुळे संघाची धावसंख्या १६२ धावांवर पोहोचली.
डावाच्या शेवटच्या १८ व्या षटकात पंजाब संघाला हरप्रीतच्या रूपाने ५ वा धक्का निश्चितच बसला, पण एकूण २५ धावा होताच धावसंख्या वेगाने १८७ धावांपर्यंत पोहोचली. सॅम करण आणि हरप्रीत सिंग भाटिया यांच्यात ५व्या विकेटसाठी ५० चेंडूत ९२ धावांची जलद भागीदारी झाली. पंजाब किंग्ज संघाला सहावा धक्का सॅम करनच्या रूपाने बसला, जो २९ चेंडूत ४षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या जितेश शर्मानेही अवघ्या ७ चेंडूत ४ षटकारांच्या मदतीने २५ धावांची जलद खेळी केली. पंजाब संघाने २० षटकांत ८ गडी गमावून २१४ धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजीत कॅमेरून ग्रीन आणि पियुष चावला यांनी २-२ तर अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनडॉर्फ आणि जोफ्रा आर्चरने १-१ बळी घेतले.