Sam Curran Big Statement About IPL Auction : पंजाब किंग्जचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने आयपीएल इतिहासात सर्वात महागडा खेळाडू असण्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी प्राईस टॅगचा दबाव स्वत:वर अजिबात घेत नाहीय. फ्रॅंचायजी खेळाडूंवर एखाद्या कारणासाठी गुंतवणूक करत असते आणि खेळाडूंचं काम असतं, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणे, अशी प्रतिक्रिया सॅमने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएल लिलावादरम्यान सॅम करनसाठी खूप महागडी बोली लावण्यात आली होती. सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. पंजाब किंग्जने त्याला १८.५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. सॅमवर इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात येईल, असा अंदाज लिलावापूर्वीच वर्तवण्यात आला होता आणि तसंच काहीसं घडलं. अनेक संघांनी सॅमला त्यांच्या स्क्वॉडमध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेवटी पंजाबने मोठी बोली लावून बाजी मारली.

नक्की वाचा – CSK ला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू महत्वाच्या सामन्यांना मुकणार? सुरेश रैना म्हणाला…

सॅमने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा खेळाडू प्राईस टॅगच्या दबावाखाली राहतात आणि ते चांगलं प्रदर्शन करतात. पण मी त्याला अपवाद आहे. मी प्राईस टॅगचा दबाव घेत नाही. स्काई स्पोर्टशी बोलताना सॅम करनने म्हटलं, तुम्हाला ते कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी खरेदी करतात आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. मी स्वत:वर जास्त दबाव घेत नाही आणि गोलंदाजी-फलंदाजीवर जास्त फोकस करतो. मला चांगलं प्रदर्शन करण्यात यश येईल, अशी आशा आहे. पैसे जे मिळाले ते मिळाले.