Sandeep Sharma taking an amazing catch of Suryakumar Yadav: आयपीएल २०२३ मध्ये चाहत्यांना एकाहून एक तुफानी फलंदाज आणि एकाहून एक गोलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सामन्याबरोबर एक नवीन नाव समोर येत असून जे रातोरात प्रसिद्ध होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. रविवारी त्यांचा सामना मुंबई इंडियन्सशी झाला. या सामन्यात संदीपने त्याच्या गोलंदाजीमुळे नव्हे तर त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वर्चस्व गाजवले. त्याच्या उत्तम क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादव रविवारी उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. त्याची फलंदाजी पाहून मुंबई संघ २१३ धावांचे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते, पण संदीप शर्माने त्याचा अप्रतिम झेल घेत, आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन करुन दिले. सूर्यकुमार यादव ५५ धावांवर बाद झाला.

IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Afghanistan Cricket Team Is Very Unhappy With Facilities Of Greater Noida Stadium
AFG vs NZ: “आम्ही इथे कधीच परत येणार नाही…”, ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या गैरव्यवस्थापनावर अफगाणिस्तान संघ संतापला, नेमकं काय घडलं?
Duleep Trophy 2024 Dhruv Jurel equaled MS Dhonis record
Duleep Trophy 2024 : विक्रमांचा ‘ध्रुव’तारा; जुरेलने केली महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
Duleep Trophy 2024 Who is Manav Suthar
Manav Suthar : दुलीप ट्रॉफीमध्ये ७ विकेट्स आणि ७ मेडन ओव्हर्स टाकणारा…कोण आहे मानव सुथार? जाणून घ्या

संदीप शर्माने सूर्याचा घेतला शानदार झेल –

ट्रेंट बोल्ट १६व्या षटकात गोलंदाजी करत होता. चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने फाईन लेगवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याला नीट टाईम करता आला नाही. त्यामुळे चेंडू दूर जाण्याऐवजी हवेत उंच गेला. त्यानंतर संदीप शर्माने १९ मीटर मागे धावत जाऊन हवेत झेप मारली आणि झेल घेतला. चेंडू हातात येताच संदीप जमिनीवर जोरात आदळला. असे होऊनही त्याच्या हातातून चेंडू पडला नाही. हा झेल पाहून केवळ संदीपचा सहकारी खेळाडू नव्हे, तर सूर्यकुमार यादवही हैराण झाला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

संदीप शर्मामुळे कपिल देव यांची आली आठवण –

या झेलने चाहत्यांना कपिल देव यांची आठवण करून दिली. १९८३ च्या विश्वचषकात कपिल देवने या पद्धतीने मागे धावत जाऊन झेल पकडला होता. त्या झेलने टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले. मात्र, संदीप शर्माचा झेल त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबईने शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना शानदार पद्धतीन जिंकला. मुंबईला शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती आणि टीम डेव्हिडने पहिल्या तीन चेंडूत षटकारांची हॅट्ट्रिक करत हे काम पूर्ण केले.

हेही वाचा – IPL 2023 MI vs RR: यशस्वी जैस्वालने ऐतिहासिक सामन्यात रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

सामन्याबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या १००० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावत २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत २१४ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी टीम डेव्हिडने २० व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूत सलग तीन षटकार मारून सामना संपवला. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालची १२४ धावांची खेळी व्यर्थ गेली. त्याचवेळी मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५५धावा केल्या. त्यांच्याशिवाय टीम डेव्हिडने ४५ आणि कॅमेरून ग्रीनने ४४धावा केल्या.