Sanju Samson vs Umpire video Viral : आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ धावांनी पराभव केला. या सामन्यात जो काही प्रकार घडला त्याची क्रीडविश्वात खूप चर्चा रंगली आहे. आरसीबीच्या फलंदाजीदरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन फील्ड अंपायर मायकल गफसोबत भिडला. जेव्हा आरसीबीच्या इनिंगचे ६ षटक संपले, तेव्हा कर्णधार सॅमसन स्ट्रटजिक टाईम आऊट घेण्याचा इशारा करतो. परंतु, सॅमसनने केलेला हा इशारा अंपायरला समजत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण राजस्थानच्या कर्णधाराकडून टाईम आऊटचा निर्णय घेतल्यानं डग आऊटमधू काही खेळाडू मैदानावर येतात. तर अंपायर टाईम आऊटचा इशारा करत नाहीत. ज्यामुळे संजू नाराज होतो आणि अंपायरसोबत वाद घालू लागतो. मैदानावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.

नक्की वाचा – केकेआरच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी धोनीचा ‘हा’ होता मास्टरमाईंड प्लॅन, गोलंदाजही ठरला यशस्वी, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

अंपायरला संजू सॅमसनला समजून सांगावं लागलं की, हे टाईम आऊट नाहीय तर फक्त एक ब्रेक आहे. तसंच टीमचे कोच कुमार संगकाराही याबाबत अंपायरशी चर्चा करतात. या घटनेनं सोशल मीडियावरही हंगामा केला आहे आणि खूप सारे युजर्स या व्हिडीओला पाहून रिअॅक्ट होताना दिसत आहेत. पण या घटनेनंतर म्हणजेच ७ व्या षटकानंतर राजस्थान टीमला अडीच मिनिटांचा टाईमआऊट दिला जातो. पण या घटनेची खूप चर्चा रंगली होती. तसंच या सामन्याला पाहण्यासाठी राहुल द्रविडही स्टेडियममध्ये आले होते.