Sanju Samson Catch Controversy: आयपीएल २०२४ मधील ५७वा सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. हा सामना निकालापेक्षा संजू सॅमसनच्या वादग्रस्त कॅचमुळे जास्त चर्चेत होता. सोशल मीडियावर संजूला बाद दिल्याच्या वादग्रस्त निर्णयावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाला. काही जणांना असं वाटतं होतं की संजू नाबाद होता, तिसऱ्या पंचांनी नीट न तपासता हा निर्णय दिल्याचे चाहत्यांनी म्हटले. तर काही क्रिकेट तज्ज्ञ पंचांच्या निर्णयाशी सहमत असल्याचे दिसून आले. पण आता स्टार स्पोर्ट्सने एक व्हीडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संजूला पंचांनी बाद का घोषित केले हे झेलबादच्या व्हीडिओद्वारे दिग्गज खेळाडू टॉम मूडी यांनी समजावले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅमसनच्या झेलबादच्या वादग्रस्त निर्णयात आता टॉम मूडीचे वक्तव्य समोर आले आहे. ज्यामुळे सॅमसन दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बाद होता की नाही हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. स्टार स्पोर्ट्सशी झालेल्या संवादादरम्यान मूडीने या विषयावर आपले मत उघडपणे मांडले. शाई होपने जेव्हा सीमारेषेजवळ सॅमसनचा झेल घेतला तेव्हा ‘सीमारेषा (बाउंड्री कुशन)’ अजिबात हलली नाही, असे मूडीचे मत आहे. यादरम्यान वाहिनीने अनेक अँगलही दाखवले. ज्यामध्ये होप सीमारेषेपासून थोड्याच अंतरावर झेल घेताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये एक्स्ट्रा झूम करून दर्शवण्यात आले आहे की शाई होपचा पाय हा सीमारेषेला लागला नव्हता.

हेही वाचा- IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल

काय आहे नेमके प्रकरण?

दिल्लीविरुद्धच्या उच्च धावसंख्येच्या सामन्यात सॅमसन जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. एकेकाळी सॅमसन एकहाती आपल्या संघाला विजयापर्यंत नेईल असे वाटत होते, पण लक्ष्य गाठण्यापूर्वीच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेजवळ झेलबाद झाला.

दिल्लीचा क्षेत्ररक्षक शाई होपने सीमारेषेजवळ सॅमसनला झेलबाद केले तेव्हा क्षणभर होपचा पाय बाऊंड्री लाईनला लागल्याचा भास झाला. मात्र, तिसऱ्या पंचांनी दुसऱ्या कोनातून पाहण्यास सुरुवात केली तेव्हा होपचा पाय सीमारेषेला स्पर्श करताना दिसला नाही. यानंतर विरोधी फलंदाजाला आऊट देण्यात आले.

पंचांच्या या निर्णयामुळे सॅमसनही क्षणभर नाराज दिसला आणि यावर त्याने आक्षेप घेत पंचांशी चर्चा करताना दिसला. बराच वेळ तो मैदानातून बाहेर जायलाही तयार नव्हता. त्याने पुन्हा रिव्हयू घेण्याचाही प्रयत्न केला पण तिसऱ्या पंचांनीच बाद दिल्याने रिव्ह्यू नाकारण्यात आला. मात्र, स्टार स्पोर्ट्स आणि मूडीजने शेअर केलेल्या व्हिडिओवरून सॅमसन त्या सामन्यात बाद झाल्याचे स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson catch controversy he was out in delhi capitals match star sports explained with tom moody watch video ipl 2024 bdg