Sanju Samson first Indian player to hit three consecutive sixes against Rashid Khan: आयपीएलच्या २३व्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सने तीन विकेट्सने पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.२ षटकांत सात गडी गमावून १७९ धावा करून सामना जिंकला. या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने एक मोठा पराक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल २०२३ मध्ये दमदार सुरुवात केली, पण पहिल्या दोन सामन्यात उत्कृष्ट लयीत दिसणारा संजू सॅमसन पुढच्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाला. मात्र, पाचव्या सामन्यात संघाला त्याची गरज असताना सॅमसनने तुफानी खेळी करत संघाला पुनरागमन करुन दिले. यादरम्यान त्याने एक अप्रतिम विक्रमही आपल्या नावावर केला. संजू सॅमसनने राशिद खानविरुद्ध षटकारांची हॅट्ट्रिक केली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.

आयपीएलच्या इतिहासात राशिद खानविरुद्ध सलग तीन किंवा त्याहून अधिक षटकार मारणारे दोनच फलंदाज आहेत. संजू सॅमसनच्या आधी ख्रिस गेलने हा पराक्रम केला होता. त्याने राशिदला सलग चार षटकार ठोकले होते. आता संजू सॅमसनने त्याच्याविरुद्ध सलग तीन षटकार ठोकले आहेत. अशाप्रकारे राशिदविरुद्ध षटकारांची हॅट्ट्रिक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. इतकेच नाही तर संजू सॅमसनची आयपीएलमध्ये रशीद खानविरुद्ध सरासरी १०० पेक्षा जास्त आहे.

हेही वाचा – IPL 2023 MI vs KKR: हृतिक शौकीन आणि नितीश राणाला वाद घालणे पडले महागात, सूर्यालाही ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड

राशिद खानविरुद्ध सहसा फलंदाज मोठे शॉट खेळणे टाळतात, पण संजू सॅमसन वेगळ्याच मूडमध्ये दिसला. त्याने राशिदला एका पाठोपाठ तीन षटकार ठोकले. राशिद खानच्या या षटकाने संघाला गती दिली आणि अखेरीस संघाला विजय मिळवून दिला. कारण याआधी संघाच्या १२ षटकात ६ बाद ६६ धावा होत्या. या षटकानंतर धावसंख्या अचानक ९० धावांच्या आसपास पोहोचली. संजू सॅमसनने या सामन्यात ३२ चेंडूत ६० धावा केल्या, जे त्याचे स्पर्धेतील दुसरे अर्धशतक होते. तसेच आतापर्यंतचे आयपीलमधील १९ वे अर्धशतक होते.