Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Highlights: आयपीएल २०२४च्या ४४व्या सामन्यात राजस्थानने लखनऊ सुपर जायंट्सविरूद्ध ७ विकेट्स आणि १ षटक राखून विजय मिळवला. राजस्थानच्या विजयात कर्णधार संजू सॅमसनने एक उत्कृष्ट खेळी खेळली आणि ३३ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७१ धावा करून नाबाद राहिला. सॅमसनच्या या विस्फोटक फलंदाजीपुढे लखनऊचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. पण लक्षवेधख ठरलं ते म्हणजे विजयानंतर संजू सॅमसनचं सेलिब्रेशन. सॅमसनने यश ठाकूरच्या चेंडूवर षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला. विजय मिळवून दिल्यानंतर सॅमसनने ज्या पद्धतीने जल्लोष केला ते पाहण्यासारखे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानच्या विजयानंतर संजू सॅमसनचं आक्रमक सेलिब्रेशन

राजस्थानच्या विजयानंतर सॅमसनने आक्रमक प्रतिक्रिया देत विजय साजरा केला, जणू सिंहाप्रमाणे गर्जना करत त्याने हे सेलिब्रेशन केले. संजू सॅमसनचा विजयानंतरचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. संजूने त्याच्या या वादळी खेळीसह वर्ल्डकपसाठी आपली दावेदारी सिध्द केली आहे. त्यामुळे विश्वचषक संघात त्याची निवड नक्कीच होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

राजस्थानने लखनऊने दिलेल्या १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली पण दोन्ही सलामीवीरांनी ठराविक अंतरानंतर आपल्या विकेट्स गमावल्या. तर रियान परागही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने कर्णधारपदाला साजेशी एक उत्कृष्ट खेळी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर संघाने एक महत्त्वाचा विजय नोंदवत प्लेऑफच्या दिशेने अजून एक पाऊल टाकले आहे.

संजूच्या या खेळीनंतर त्याला टी-२० विश्वचषक संघात स्थान देण्याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. सामन्यानंतर समालोचक केविन पीटरसननेही सॅमसनच्या टी-२० विश्वचषक संघात समावेश करण्याबाबत आपले मत मांडले आणि सांगितले की,”जर मी भारतीय निवडकर्ता असतो, तर संजू सॅमसन हा टी-२० विश्वचषकासाठी माझी पहिली निवड असेल.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson roar celebration viral video after match winning six in lsg vs rr ipl 2024 bdg