अर्जुन तेंडुलकरने अखेर आयपीएलमधील पहिल्या विकेटवर शिक्कामोर्तब केलं. सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुनने भुवनेश्वर कुमारला बाद करून पहिली विकेट घेतली. अर्जुनने शेवटचं षटक फेकलं होतं. ज्यूनीयर तेंडुलकरने त्याच्या शेवटच्या षटकात अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यामुळं मुंबई इंडियन्सने हैद्राबादचा १४ धावांनी पराभव केला. अर्जुनची गोलंदाजी पाहिल्यानंतर माजी क्रिकेटर्सने यावर प्रतिक्रिया दिल्या. तसंच अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरनेही यावर रिअॅक्शन दिली आहे. इन्स्टास्टोरीवर साराने पोस्ट शेअर करत तिला झालेला आनंद व्यक्त केला आहे. साराने अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये साराने लिहिलंय, या वेळेची खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती. मला तु्झ्यावर खूप अभिमान आहे. हायलाईट्सला पुन्हा पुन्हा पाहत आहे.
सामन्यात कॅमरून ग्रीनने ४० चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या आणि तिलक वर्माने १७ चेंडूत ३७ धावांची आक्रमक खेळी केली. दरम्यान, मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १९२ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैद्राबादने १९. ५ षटकात १७८ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने १४ धावांनी या सामन्यात विजय मिळवला. सनरायझर्ससाठी मयंक अग्रवालने ४१ चेंडूत ४८ धावा केल्या. हेनरिच क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावा केल्या. क्लासेनच्या आक्रमक खेळीनं मुंबई इंडियन्सवर दबाव टाकला होता.
पीयुष चावलाच्या एका षटकात क्लासेननं चौकार षटकार ठोकून २१ धावा कुटल्या होत्या. हैद्राबादचा पराभव करून मुंबईने सलग तिसरा विजय मिळवला आहे. अर्जुन तेंडुलकर २०२१ पासून मुंबई इंडियन्स संघासोबत जोडलेला होता. परंतु, त्याला २०२१ आणि २०२२ ला संधी मिळाली नाही. पण २०२३ मध्ये अर्जुनला पहिल्यांदा आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. केकेआरविरुद्ध अर्जुनने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सामन्यात अर्जुनने २ षटकांची गोलंदाजी केली.