Sunrisers Hyderabad Submitted Wrong Team Sheet : सनरायझर्स हैद्राबाद आयपीएल २०२३ च्या प्ले ऑफ च्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने हैद्राबादचा सात विकेट्सने पराभव केला. एसआरएचने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ६ विकेट्स गमावत १८२ धावांपर्यंत मजल मारली होती. या इनिंगमध्ये एसआरएचच्या संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आलं नाही. हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तर अब्दुल समद ३७ धावांवर नाबाद राहिला होता. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना लखनऊच्या प्रेरक मंकडने नाबाद ६४ धावांची खेळी साकारली.
स्टॉयनिस ४० आणि निकोलस पूरनने १३ चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्नसे हैदराबादच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. मात्र, ही इनिंग सुरु असताना एडन मार्करमने केलेल्या एका गंभीर चुकीवर समालोचक कक्षात असलेल्या स्कॉट स्टायरिसने लक्ष वेधलं. एसआरएचच्या संघाने चुकीची शीट सबमिट केली असल्याचं स्टायरिसने उघडकीस आणलं. स्टायरिसने कॅमेरासमोर ही शीट दाखवून एसआरएचचा पर्दाफाश केला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
आयपीएल २०२३ च्या नियमानुसार नाणेफेक होण्याआधी संघाची प्लेईंग ११ जाहीर करावी लागते. दोन्ही कर्णधारांना त्यांच्यासोबत दोन शीट ठेवाव्या लागतात. प्रथम फलंदाजी असल्यास एका शीटनुसार खेळाडू मैदानात उतरतात. तर गोलंदाजी असल्यास दुसऱ्या शीटनुसार खेळावं लागतं. सनरायझर्स हैदराबादच्या शीटवर प्रतिक्रिया देताना स्टायरिस म्हणाला, लखनऊ विरोधात झालेल्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू सनवीर सिंगचं पदार्पण होणं क्रमप्राप्त होतं. परंतु, संघाच्या शीटमध्ये सनवीरचं नाव खोडण्यात आलं असून त्याच्या जागेवर प्लेईंग ११ मध्ये टी नटराजनच्या नावाचा उल्लेख केला गेला. त्यामुळे सनवीर सिंगला इॅम्पॅक्ट प्लेयरचा पर्याय म्हणून ठेवण्यात आला.
चुकीच्या शीटवर एसआरचने त्याचं नाव खोडलं असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्यांनी ही शीट सबमीट केली असावी. जर त्यांनी एखाद्या फलंदाजाला बाहेर ठेवलं, तर ते गोलंदाजाला संधी देऊ शकत नाही.” दरम्यान, एसआरच जेव्हा स्कोअर डिफेंड करण्यासाठी मैदानात उतरली, त्यावेळी इॅम्पॅक्ट प्लेयर म्हणून विवरंत सिंग या खेळाडूचं नाव समोर आलं. अनमोल प्रीतच्या जागेवर तो बदली खेळाडू होता.