Shahrukh Khan and Son Abram Viral Video of KKR Practice session: बॉलीवूडचा किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक शाहरूख खान केकेआरच्या सराव सत्रात सामील झाला होता. शाहरूख खानसोबत त्याचा लेक अबराम खानही या सराव सत्रात क्रिकेट खेळताना दिसले. ज्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहरूखच्या लेकाच्या यॉर्करसमोर रिंकू सिंग गडबडला
दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध केकेआरच्या सामन्यापूर्वी सराव सत्रात ईडन गार्डन्सवर शाहरूख आणि अबराम पोहोचले होते. शाहरूख फलंदाजी करत होता, समोर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर शाहरूख फटके मारत होता. तर त्याचा लेक अबराम खान केकेआरचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंगला गोलंदाजी करत होता. अबरामने रिंकूला एक वाइड यॉर्कर टाकला, ज्यावर रिंकू गडबडताना दिसला. रिंकूसारख्या फलंदाजाला अबरामला आपल्या गोलंदाजीने चांगलेच चकित केले. रिंकू हा टी-२० विश्वचषकासाठी निवड होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
शाहरूख आणि अबरामच्या या व्हीडिओवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शाहरूख केकेआरच्या सामन्याला उपस्थित असतो आणि घरच्या मैदानावरील एकही सामना तो चुकवत नाही. त्याच्यासोबत कधी सुहाना, तिच्या मैत्रिणी तर अबराम आणि शाहरुख सामना पाहण्यासाठी उपस्थित असतात. अबरामचा रिंकूला गोलंदाजी करतानाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोमवारी ईडन गार्डन्सवर केकेआरचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. नाइट रायडर्सने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ जिंकले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत. यासह संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.