आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा शेन वॉर्नचं मार्गदर्शन मिळणार आहे. शेन वॉर्नची राजस्थान रॉयल्स संघाचा ब्रँड अँबेसिडर आणि टीम मेंटॉर या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अवश्य वाचा – TV Presenter नेरोली मेडोव्जचं IPL मध्ये पदार्पण
“राजस्थान रॉयल्स संघासोबत पुन्हा काम करायला मिळतंय याचा मला आनंद आहे. यंदा माझ्यावर दुहेरी जबाबदारी असणार आहे. विविध संघातील अनुभवी आणि तरुण खेळाडूंसोबत यंदा काम करताना मला नक्कीच मजा येणार आहे. यंदाच्या हंगामात अँड्रू मॅक्डोनाल्डसोबत काम करताना संघ चांगली कामगिरी करेल अशी मला आशा आहे.” शेन वॉर्नने माहिती दिली. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या पहिल्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं होतं.
First published on: 13-09-2020 at 19:08 IST
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane warne returns to rajasthan royals psd