IPL 2023 KKR Team Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या लीगच्या अगोदर, कर्णधार विषयी कोलकाता नाइट रायडर्ससमोर ही समस्या उद्भवली आहे. कारण पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर या आयपीएलच्या हंगामातून बाहेर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुखापतग्रस्त असलेल्या अय्यरला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे तो बराच काळ मैदानातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. अशात कोलकाता नाइट रायडर्स समोर संघाची सूत्रं कोणाच्या हातात द्यावी असा प्रश्न पडला आहे.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर, आता केकेआरचा नवीन कर्णधार कोण असेल? हा एक मोठा प्रश्न आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, अंतरिम कर्णधार होण्याच्या शर्यतीत शार्दुल ठाकूर आणि सुनील नरेन हे शर्यतीत आघाडीवर आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की केकेआर १ किंवा २ दिवसांच्या आत आपला नवीन कर्णधार घोषित करू शकतो.
केकेआरची पहिली पसंती शार्दुल ठाकूर –
टाइम्स ऑफ इंडियाला एका सूत्रांनी सांगितले की, ‘एक मोठे कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि परदेशी पॉप स्टार यांचा समावेश असेल. त्यावेळी नवीन कर्णधाराची घोषणा केली जाईल. कारण त्याला जबाबदारी दिल्याने भारतीय खेळाडूंशी संवाद साधणे चांगले होईल.
शार्दुल आणि सुनील –
सुनील नरेनबद्दल बोलायचे तर, केकेआर सोबतचा त्याचा आयपीएल अनुभव प्रथम निवडीसाठी प्राधान्य देतो. तो केकेआरसाठी सर्वात जास्त विकेटच घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर १२२ विकेट्स आहेत. त्याचबरोबर तो दोन वेळच्या संघातील प्रमुख खेळाडू राहिला आहे. केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपद पटकावले होते, तेव्हा सुनील नरेनने विजयात मोलाची भूमिका बजावली होती. शार्दुल ठाकूरला कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सकडून १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तसेच केकेआरसाठी हा त्याचा पहिला हंगाम असणार आहे. हे त्याच्या कर्णधारपदाच्या मार्गावर अडथळा ठरु शकते.
केकेआर १ एप्रिल रोजी पहिला सामना खेळेल –
आयपीएलच्या इतिहासात केकेआर दोन वेळा चॅम्पियन बनला आहे. १६ व्या हंगामात, हा संघ १ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्धचा पहिला सामना खेळेल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि तिसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल.
आयपीएल २०२३ साठी केकेआरचा संघ –
श्रेयस अय्यर (दुखापतग्रस्त), नितीश राणा, रहमानुल्लाह गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्डुल ठाकूर, लॉक्की फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊथी, हर्षित राणा, वरुण चक्राबोरी, रुकरान, रिंकी सुयाश शर्मा, डेव्हिड वाईस, कुलवंत खेरोलिया, मंडीप सिंग, लिट्टन दास, शकीब अल हसन.