Shardul Thaukr IPL 2025 Purple Cap: लॉर्ड शार्दुल ठाकूर… आयपीएल २०२५ मध्ये ज्या खेळाडूला लिलावात कोणी बोली लावली नाही, त्याच शार्दुलने आयपीएल २०२५ मध्ये बदली खेळाडू म्हणून येत नंबर वन गोलंदाज ठरला आहे. शार्दुल ठाकूरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात भेदक गोलंदाजी करत फलंदाजांच्या धावांवर चांगलाच ब्रेक लावला. आयपीएल २०२५ च्या सुरूवातीलाच पर्पल कॅप नावे करणाऱ्या ४ षटकांत ३४ धावा देत ४ विकेट घेतले.
शार्दुल ठाकूरने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने २ सामन्यात ६ विकेट घेतल्या आहेत. शार्दुल ठाकूरने आयपीएल 2025 मध्ये आज वर्चस्व गाजवले असले तरी याआधी त्याला कोणत्याही संघाेन लिलावात बोली लावली नव्हती आणि तो अनसोल्ड गेला होता. तो मेगा लिलावात २ कोटींच्या मूळ किमतीसह उतरला होता.
आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून ४ कोटी रुपयांसह संघाता भाग होता, पण चेन्नईने त्याला आयपीएल २०२५च्या लिलावापूर्वी रिलीज केले होते. लिलावात चेन्नईनेही त्याचा संघात समावेश केला नाही. यानंतर लखनौ सुपर जायंट्सने त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज मोहसीन खान दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला, पण आता तोच शार्दुल ठाकूर त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज ठरला आहे.
शार्दुलला लखनौच्या संघाने संधी देताच त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर कामगिरी करत त्याला लॉर्ड ठाकूर का म्हणतात हे सिद्ध केलं. या मोसमातील पहिल्या सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिल्याच षटकात २ विकेट घेत पुनरागमनाचे संकेत दिले. यानंतर त्याने हैदराबादविरुद्ध सामन्यात पॉवरप्लेमध्ये अभिषेक शर्मा आणि इशान किशनसारख्या फलंदाजांना बाद करत आपल्या कामगिरीची पुन्हा छाप पाडली. शार्दुलने त्याच्या स्पेलमधील दुसऱ्याच षटकात दोन चेंडूंत दोन विकेट घेत हैदराबादच्या फलंदाजीला आळा घातला.
तर डावातील अखेरच्या षटकांमध्ये त्याने शमी आणि अभिनव मनोहरची विकेट घेत ४ विकेट्स पूर्ण केले. अशारितीने त्याने ४ षटकांत ३४ धावा देत ४ विकेट घेतले. ही त्याची या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह शार्दुल ठाकूरने त्याचे आयपीएलच्या कारकिर्दीतील १०० विकेट्सही पूर्ण केले आणि यंदाची पर्पल कॅपही त्याच्याकडे आहे.