Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore Score Updates : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामाता एकापेक्षा एक रंगतदार सामने होत असून या लीगचा ९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सुरु आहे. इडन गार्डनमध्ये कोलकाता-बंगळुरुची लढत सुरु असून आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची खराब सुरुवात झाली. पॉवर प्ले मध्येच कोलकाताच्या संघाचे दोन फलंदाज गार झाले. डेविड विलीने एकाच षटकात दोन फलंदांजांच्या दांड्या गुल केल्या. विलिने व्येंकटेश अय्यर आणि मनदीप सिंगला स्वस्तात माघारी पाठवले. त्यानंतर केकेआरचा सलामीवीर फलंदाज रहमनुल्लाह गुरबाजने धडाकेबाज फलंदाजी करत दमदार अर्धशतक ठोकलं.

पण शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंगने चौफेर फटकेबाजी करत वादळी खेळी केली. रिंकू सिंगने ३३ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. तर शार्दुलने आरसीबीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २९ चेंडूत ६८ धावांची धडाकेबाज खेळी करत आयपीएलमधील पहिलं अर्धशतक ठोकलं. त्यामुळे कोलकाताने २० षटकांत ७ बाद २०४ धावा केल्या. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी २०५ धावांची मजल मरावी लागणार आहे.

India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

आरसीबीने गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या केकेआरची पॉवर प्ले मध्ये खराब सुरुवात झाली. डेविड विलीने भेदक मारा करत केकेआरच्या दोन फलंदाजांचा त्रिफळा उडवला. विलीने अय्यरला अवघ्या तीन धावांवर बाद केलं, तर मनदीप सिंगला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर आरसीबीचा गोलंदाज ब्रेसवेलने कर्णधार नितीश राणाला एका धावेवर असताना बाद केलं. त्यानंतर कर्ण शर्माने अप्रतिम गोलंदाजी करत एकाच षटकात गुरुबाज आणि आंद्रे रसलला बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला.

गुरबाजने ४४ चेंडूत ५७ धावांची खेळी केली पण रसेल शून्यावर बाद होऊन माघारी परतला. परंतु, शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंगने सावध खेळी करत आरसीबीच्या गोलंदांजांचा समाचार घेतला आणि धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. आरसीबीसाठी डेविड विलीने दोन विकेट घेतल्या. तसंच कर्ण शर्मालाही दोन विकेट्स घेण्यात यश आलं. तर ब्रेसवेलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. गुरुबाजने ३ षटकार आणि ६ चौकार ठोकून ४४ चेंडूत ५७ धावा कुटल्या.