Shikhar Dhawan 1st batsman to hit 900 boundaries in IPL : आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजयी सुरुवात केली. सॅम करनच्या ६३ धावांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने हा सामना ४ गडी राखून जिंकला. तसेच दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करणारा ऋषभ पंत काही खास करु शकला नाही. एवढेच नाही तर कर्णधार पंतने या सामन्यात काही चुका केल्या ज्या कदाचित दिल्लीला महागात पडल्या. या दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने एक मोठा विक्रम केला.

शिखर धवनने रचला इतिहास –

या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवननेही संघासाठी सलामी दिली आणि ४ चौकारांच्या मदतीने २२ धावांची खेळी केली. या ४ चौकारांच्या जोरावर धवनने आयपीएलमध्ये इतिहास रचला. धवनच्या नावावर ७५४ चौकार आणि १४८ षटकार आहेत, ज्यामुळे आयपीएलमध्ये त्याच्या बाउंड्रीजची संख्या ९०२ झाली आहे. लीगच्या १७ वर्षांच्या इतिहास इतर कोणत्याही फलंदाजाने चौकार आणि षटकारांसह ९०० बाउंड्रीजचा टप्पा गाठला नाही. त्यामुळे तो आयपीएलमध्ये ९०० बाउंड्रीज (चौकार षटकारांची संख्या) मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
Mahakumbh Mela 2025
Mahakumbh Mela 2025: स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाकडून काय शिकवण मिळाली? १९५४ च्या प्रयागराज महाकुंभाचा इतिहास काय सांगतो?
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
security beefed up around z morh tunnel
‘झेड मोढ’ बोगद्याभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटनाची शक्यता

शिखर धवन हा आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. या लीगमध्ये सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ८७८ बाउंड्रीज लगावल्या आहेत. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर या लीगमध्ये ८७७ बाउंड्रीजसह तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत रोहित शर्मा ८११ बाउंड्रीजसह चौथ्या स्थानावर आहे, तर ख्रिस गेल ७६१ बाउंड्रीजसह पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IPL 2024 : लिव्हिंगस्टोनचा विजयी षटकार आणि पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय, सॅम करन ठरला विजयाचा शिल्पकार

आयपीएलमध्ये सर्वाधिक बाउंड्रीज (चौकार षटकारांची एकूण संख्या) मारणारे फलंदाज –

९०२ – शिखर धवन
८७८ – विराट कोहली
८७७ – डेव्हिड वॉर्नर
८११ – रोहित शर्मा
७६१ – ख्रिस गेल
७०९ – सुरेश रैना
६६४ – एबी डिव्हिलियर्स

हेही वाचा – Shreyas Iyer : केंद्रीय करार आणि दुखापतीवर श्रेयसने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘जर तुम्ही भूतकाळ किंवा भविष्यावर…’

सामन्याबद्दल बोलायचे, तर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सुरुवातील फलंदाजीत दिल्लीचा संघ संघर्ष करत असल्याचे दिसत होत, मात्र २०वे षटक टाकायला आलेल्या हर्षल पटेलच्या षटकात अभिषेक पोरेलने २५ धावा देत दिल्लीला १७४ धावांपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने वेगवान सुरुवात केली. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या, पण सॅम करन दमदार अर्धशतक झळकावून पंजाब किंग्जला ४ गडी राखून विजय मिळवून दिला.

Story img Loader