Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Score Updates: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) आणि पंजाब किंग्स (पीबीकेएस) यांच्यात आयपीएलच्या १६ व्या हंगामातील १४ वा लीग सामना खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. ज्यामुळे पंजाब किंग्ज संघाला २० षटकात १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबसाठी संघाचा कर्णधार शिखर धवनने ६६ चेंडूत सर्वाधिक ९९ धावांची खेळी केली, तर हैदराबादकडून मयंक मार्कंडेने चेंडूसह ४ बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंजाब संघाने पहिल्या ६ षटकात ३ विकेट गमावल्या होत्या-

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंजाबकडून डावाची सुरुवात करणाऱ्या कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन कौर या जोडीला संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. प्रभसिमरन खाते न उघडता भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला.

धवन राठीच्या भागीदारीने मोडला मोठा विक्रम –

धवन भलेही शतक पूर्ण करू शकला नसेल पण या काळात त्याने एक विक्रम नक्कीच मोडला. धवनने मोहित राठीसोबत शेवटच्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली, जो आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासातील १०व्या विकेट्साठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम आहे. दोघांनी ५ षटकांची भागीदारी केली, ज्यामध्ये राठीने केवळ २ चेंडू खेळले आणि धवनने २८ चेंडू खेळून संघाचा डाव सावरला. धवनने ६६ चेंडूत ९९ धावा केल्या आणि नाबाद परतला. त्याच्याशिवाय पंजाबचे उर्वरित १० फलंदाज केवळ ३८ धावा करू शकले, तर ६ धावा वाईड आणि लेग बायमधून आल्या.

हेही वाचा – IPL 2023: राशिद खानने रचला इतिहास; कोलकात्याविरुद्ध हॅटट्रिक नोंदवत ‘या’ पाच गोलंदाजांना टाकले मागे

धवनने पंजाबचा डाव सावरला –

पंजाब किंग्जने ६९ धावांपर्यंत आपला निम्मा संघ गमावला होता, त्यानंतर शिखर धवन एका बाजूने संघाची धावसंख्या वाढवत राहिला, तर दुसऱ्या बाजूकडून विकेट्स पडण्याची प्रक्रिया सातत्याने पाहायला मिळाली. या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ २० षटकांत १४३ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला, ज्यामध्ये कर्णधार धवनच्या बॅटमधून ९९ धावांची नाबाद खेळी पाहायला मिळाली. पंजाबच्या ९ फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. मोहित राठीसह धवनने अखेरच्या विकेटसाठी ५५ धावांची शानदार भागीदारी केली.

हैदराबादसाठी या सामन्यात लेगस्पिनर मयंक मार्कंडेने आपल्या गोलंदाजीत केवळ १५ धावा देत ४ षटकात ४ बळी घेतले. याशिवाय उमरान मलिक आणि मार्को यान्सिन यांनी २-२ विकेट्स आपल्या नावावर केल्या.