Shikhar Dhawan Golden Duck: आयपीएल २०२३ मधील ६४ वा सामना धर्मशााला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेल. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दिल्लीने २० षटकांत २ बाद २१३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करायला उतरेलेल्या संघाचा कर्णधार शिखर धवन पहिल्याच चेंडूंवर बाद झाला. त्यामुळे त्याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिखर धवनने पहिल्याच चेंडूवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा प्लॅन फसला आणि इशांत शर्माच्या चेंडूने त्याच्या बॅटची कडा घेतली. त्यानंतर हा चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अमन खानच्या विसावला आणि तो झेलबाद झाला. तसेच आयपीएल २०२३ मध्ये मध्ये इशांत शर्माने शिखर धवनला बाद करण्याची ही दुसरी वेळ होती. कारण या अगोददर सलामीवीराने अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही त्याने धवनला बाद केले होते. त्यावेळी शिखर धवन सात धावांवर बाद झाला होता, मात्र आज त्याला आपले खातेही उघडता आले नाही.

शिखर धवननेही आयपीएलमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्यासलामीवीरांच्या यादीत स्थान मिळवले. याबाबतीत त्याने गौतम गंभीरची बरोबरी केली आहे. या यादीत पार्थिव पटेल आयपीएलमध्ये सर्वाधिक ११ वेळा शून्यावर बाद होणार सलामीवीर आहे. शिखर धवन आणि गौतम गंभीर प्रत्येकी १०-१० वेळा शून्यावर बाद होणारे सलामीवीर आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे सलामीवीर –

११ – पार्थिव पटेल
१० – शिखर धवन
१० – गौतम गंभीर
१० – अजिंक्य रहाणे<br>९ – डेव्हिड वॉर्नर</p>

दिल्लीने शेवटच्या ५ षटकात ६५धावा केल्या, रुसोने आपले अर्धशतक पूर्ण केले –

पृथ्वी शॉ पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर रिले रोसोला फिल सॉल्टची साथ मिळाली. दोघांनी मिळून शेवटच्या 5 षटकांमध्ये वेगाने धावा काढण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. रुसोने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक २५ चेंडूत पूर्ण केले. यानंतर दिल्लीने डावाच्या १९व्या षटकात एकूण १९धावा केल्या तर २०व्या षटकात २३ धावा झाल्या. दिल्लीसाठी रिले रोसूच्या बॅटने ८२ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ४६आणि पृथ्वी शॉने ५४धावा केल्या. पंजाबकडून सॅम करणने गोलंदाजीत २ बळी घेतले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan equaled gautam gambhirs embarrassing record by getting golden duck against delhi capitals vbm