आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जला मात देत सात विकेट्सने विजय मिळवला. वेगवान गोलंदाज उमरान मलिकने चार बळी घेत हैदराबादच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाबने १५१ धावांचा डोंगर उभारून हैदराबादला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. या सामन्यात सलामीला आलेला शिखर धवन पहिल्याच षटकात जखमी झाला. सुरुवातीलाच जखमी झाल्यामुळे धवन अवघ्या आठ धावा करु शकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> IPL 2022 : भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास; ‘आयपीएल’मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

सामन्याच्या सुरुवातीला पंजाब किंग्जकडून शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग सलामीला आले. तर भुवनेश्वर कुमारने हैदराबाद संघाकडून पहिले षटक टाकले. या पहिल्या षटकात शिखर धवनने तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार लगावला. त्यानंतर चौथ्या चेंडूचा सामना करताना त्याने जोरात बॅट फिरवली. मात्र वेगात आलेला हा चेंडू शिखर धवनच्या कंबरेवर लागला. ज्यामुळे शिखर धवन जागीच जखमी झाला. जोराचा मार लागल्यामुळे बॅट सोडून देत तो खाली झोपला.

हेही वाचा >>> IPL 2022 : केन विल्यम्सनने DRS घेताच जॉनी बेअरस्टो खवळला, पंजाब-हैदराबाद सामन्यात मैदानातच राडा

जोराचा मार लागल्यामुळे शिखर धवन हेल्मेट काढून मैदानावरच झोपला होता. ज्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. पाच ते दहा मिनिटे सामना थांबल्यानंतर शेवटी शिखर धवनने स्वत:ला सावरलं. मात्र जखमी झाल्यामुळे तो आपली जादू दाखवू शकला नाही. त्याने पुढे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. धववने ११ चेंडूंमध्ये आठ धावा केल्या.

हेही वाचा >>> IPL 2022, PBKS vs SRH : उमरान मलिक नावाच्या वादळात पंजाब नेस्तनाबूत, घेतल्या ६ चेंडूंमध्ये ४ विकेट्स!

तर दुसरीकडे वीस षटकांत पंजाबने १५१ धावा केल्या. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३३ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. मात्र सनरायझर्स हैदरबादने सात गडी राखून १५२ धावा करत पंजाबला पराभूत केले.